जिल्ह्यातील दुर्गम भागातील रुग्णांपर्यंत पोहोचून तातडीचे उपचार मिळवून देणाऱ्या १०८ क्रमांकांच्या रुग्णवाहिकेने जिल्ह्यात गेल्या ११ वर्षात २ लाख ४८ हजार ८५९ लोकांचे प्राण वाचवले आहेत. खऱ्या अथनि ही सेवा रुग्णांसाठी लाइफलाइन ठरत आहे. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एमईएमएस) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात सध्या १७ रुग्णवाहिका सेवा देत आहेत. ही सेवा दरदिवशी सुमारे ६२ रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरत आहे. १०८ ही वैद्यकीय सेवा वेळेवर आणि जीव वाचवणारी आपत्कालीन सेवा आहे. विशेषतः गंभीर परिस्थितीत रुग्णांपर्यंत जलद पोहोचण्यासाठी शहरी भाग, दुर्गम आणि आदिवासी भाग आणि महामार्ग यांचा समावेश करून ही सेवा २४ तास कार्य करत आहे. १०८ रुग्णवाहिका गरजूंना तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि यंत्रणांनी सुसज्ज आहे. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS) २६ जानेवारी २०१४ रोजी सुरू झाली. या सेवेने १०८ ही वैद्यकीय सेवा वेळेवर आणि जीव वाचवणारी आपत्कालीन सेवा आहे.
विशेषतः गंभीर परिस्थितीत रुग्णांपर्यंत जलद पोहोचण्यासाठी शहरी भाग, दुर्गम आणि आदिवासी भाग आणि महामार्ग यांचा समावेश करून ही सेवा २४ तास कार्य करत आहे. १०८ रुग्णवाहिका गरजूंना तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि यंत्रणांनी सुसज्ज आहे. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS) २६ जानेवारी २०१४ रोजी सुरू झाली. या सेवेने जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत २४ हजार १६ रुग्णांचे प्राण वाचवले. यात सर्वाधिक १९ हजार ७१७ कॉल वैद्यकीय कारणासाठी होते. ११ वर्षात ही सेवा तब्बल २ लाख ४८ हजार ८५९ रुग्णांसाठी लाइफलाइन ठरली तर ४९९ बालकांचा याच रुग्णवाहिकांमध्ये जन्म झाला आहे. अपघातग्रस्त रुग्णांना तात्काळ उपचाराची गरज असते. अशावेळी १०८ रुग्णवाहिका माहिती मिळताच घटनास्थळी जावून रुग्णांना तात्काळ उपचार उपलब्ध करून देते. त्यामुळे अपघातग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण घटल्याचे चित्र पहावयास मिळत आहे
