यंदा होळी सण लक्षात घेऊन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. अतिरिक्त सेवा सुरू झाल्याने अनेकांना वेळेत घरी पोहोचणे शक्य होईल. भारतीय रेल्वेने यावर्षी तब्बल १,४१० होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे. सणाच्या काळात देशभरातून होणारी मोठी प्रवासी हालचाल लक्षात घेऊन ही योजना आखण्यात आली आहे. अतिरिक्त गाड्यांमुळे गर्दी कमी होईल आणि तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल. मध्य रेल्वेकडून देशातील विविध मार्गावर २०९ विशेष गाड्या धावणार आहेत. मुंबई नागपूर, मुंबई रत्नामिरी, मुंबई चिपळूण अशा महत्त्वाच्या मार्गांचा यात समावेश असेल. या गाड्यांमध्ये वातानुकूलित, शयनयान तसेच सामान्य डबे असणार असून काही अनारक्षित सेवा देखील असतील. स्थानकांवर अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू करून प्रवाशांची सोय केली जाणार आहे. गाड्यांचे वेळापत्रक आणि थांबे लवकर जाहीर केले जातील..
वाढत्या मागणीचा विचार करून पश्चिम रेल्वेने २३१ सुट्टीकालीन विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. या सेवा १ ते २२ चरीलह २०२६ दरम्यान चालतील. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान तसेच उत्तर व पूर्व भारतातील शहरांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे, कारण या मार्गावर होळीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रवास होती. मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित असल्याने प्रमुख स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, उधना, सुरत, अहमदाबाद आदी ठिकाणी विशेष व्यवस्था केली जाईल. प्रतीक्षा क्षेत्रांमध्ये बसण्याची सोय, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था, पंखे आणि घोषणा प्रणाली उपलब्ध असतील. विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना अधिक पर्याय मिळतील आणि सणासाठी प्रवासाचे नियोजन करणे सोपे होईल. रेल्वे प्रशासनाने सुविधा वाढवून सुरक्षित व सोयीस्कर प्रवासावर भर दिला आहे. त्यामुळे यंदाच्या होळीला अनेक कुटुंबे वेळेत आपल्या घरी पोहोचून सणाचा आनंद घेऊ शकतील.
