भारताची अवस्था सध्याच्या घडीला कोरोनाच्या वातावरणामुळे चिंताजनक बनली आहे. त्यामुळे काही देशांनी भारतातून येणाऱ्या विमानावर बंदी घातलेली आहे. त्यामुळे भारतामधून कोणतीही व्यक्ती इतर कोणत्याही देशांमध्ये प्रवास करू शकत नाही. त्यासाठी इंग्लंडच्या दौऱ्याच्या बाबतीतही बीसीसीआयने खेळाडूंबाबत मोठा निर्णय घेतला असल्याचे समजले आहे.
बीसीसीआयने इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय खेळाडूंना फक्त कोविशील्ड या लसीचा निदान एक तरी डोस घेण्यास सांगितले आहे. भारतीय खेळाडूंनी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी कोरोनावरील लसीचा एक डोस घ्यावा, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्याच बरोबर ठराविक कालावधी नंतर खेळाडूंनी दुसरा डोस कधी आणि कुठे घ्यायचा, याबाबतही सल्लामसलत बीसीसीआय करत आहे. भारतीय खेळाडूंसाठी दुसरा डोस देण्यासाठीची व्यवस्था करण्यासाठी बीसीसीआय सध्या घडीला इंग्लंडशी संपर्कात असल्याचे समजत आहे. त्यामुळे या खेळाडूंना दुसरा डोस इंग्लंडमध्ये गेल्यावर देण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना चाचणी, क्वारंटाइन याबरोबरच खेळाडूंना आता इंग्लंडच्या दौऱ्यापूर्वी कोरोनाची लसही घेणे अनिर्वाय केले आहे.
तसेच बीसीसीआयने खेळाडूंना महत्वाच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार खेळाडूंना मुंबई मधुनच इंग्लंडसाठी रवाना व्हावे लागणार आहे. मुंबईत दाखल होताच प्रथम त्यांची कोरोनाची चाचणी केली जाणार असून, या कोरोनाच्या चाचणीमध्ये जर कोणाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला तर त्यांच्यासाठी यावेळी कोणत्याही वेगळ्या खासगी विमानाची सोय केली जाणार नाही. ज्या खेळाडूंना इंग्लंडला स्पर्धेसाठी जायचे आहे, त्यांनी मुंबईमध्ये येण्यापूर्वीही आपले 72 तासंपुर्वीचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट दाखवावे लागणार आहेत. त्यानंतरच त्यांना इंग्लंडच्या दौऱ्यासाठी प्रवेश आकरण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वतयारी म्हणून बीसीसीआय इंग्लंडला जाणाऱ्या भारताच्या कोणत्याचं खेळाडूला किंवा क्रिकेट मंडळाला कोणत्याही प्रकारच्या समस्येला तोंड द्यावं लागू नये, यासाठी आधीपासूनच काळजी घेताना दिसत आहे. त्यामुळे बीसीसीआयला यावेळी काही कडक निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यामुळे आता इंग्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी परदेशी दौऱ्यावर जाण्यासाठी प्रत्येक भारतीय खेळाडूंना ही गोष्ट करणे अत्यावश्यकचं आहे. जर कोणत्याही खेळाडूने ही गोष्ट करण्यास नकार दिला तर त्याच्या बाबतीत योग्य आणि कडक निर्णय घ्यायला बीसीसीआयला लागणार आहे.
18 जूनपासून सुरू होणाऱ्या पहिल्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारता समोर प्रथम न्यूझीलंडचे आव्हान आहे. हे सामने 18 जून ते 22 जून या कालावधीमध्ये द एजीस बाउल या स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. यानंतर दिड महिना इंग्लंडमध्येचं वास्तव्य केल्यानंतर 4 ऑगस्ट पासून इंग्लंडसोबत टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. भारतीय मेन्स क्रीकेट टीमसह, वुमन्स टीमदेखील इंग्लंड दौऱ्यावर खेळण्यासाठी जाणार आहे. वुमन्स टीमचे स्पर्धांचे शेड्युल इंग्लंडमध्ये 16 जून ते 15 जुलै दरम्यान असून त्यामध्ये 1 टेस्ट, 3 वनडे आणि 3 टी-20 स्पर्धांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे, बीसीसीआय इंग्लंडमध्ये स्वत: बायो सिक्योर बबल तयार करण्याच्या विचारात आहे.