29 C
Mumbai
Thursday, November 21, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeSports Newsआयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत अधिक संघांचा समावेश

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत अधिक संघांचा समावेश

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद 2024 च्या आवृत्तीमध्ये सध्याच्या असलेल्या स्वरुपामध्ये वाढ करून 16 ऐवजी 20 संघाचा सहभाग करण्यावर विचारविनिमय करत असल्याचे समोर आले आहे. प्राप्त अहवालानुसार, लीग टप्प्यात एकूण 20 संघाचे, पाचच्या गटामध्ये चार संघांचे विभाजन करण्यात येईल. आता स्पर्धेच्या विस्ताराबाबत आयसीसीने आपले मत ठाम केले असून ऑलिम्पिक यामागील मुख्य कारण असल्याचे म्हटले आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 आणि 2022 सालच्या सध्याच्या त्यांच्या संघाचे स्वरूप 16 संघाचेच राहील.

भारतात ऑक्टोबरमध्ये 2021 आवृत्ती खेळली जाणार असून 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाकडे नीयोजन असेल. आयसीसीचे छोट्या फॉर्मेट शिवाय आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये देखील सध्याच्या दहा टीम असलेल्यामध्ये वाढ करून ते 14 अशी करण्याच्या विचारामध्ये आहे. तथापि 2023 मध्ये होणार्या वर्ल्डकपमध्ये हा विस्तार दिसण्याची शक्यता फारच कमी असल्याचे सांगण्यात आले. रग्बी आणि फुटबॉलसारख्या खेलांना नियम वेगळे आणि इतर खेळांसारखे क्रिकेटमध्ये सर्वसमावेशकतेचे आनंदाने स्वागत केले जात नाही. आयसीसीने 2007 मध्ये पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील 16 संघांमधून हळूवारपणे सहभागी संघांची संख्या कमी करण्यात आली आहे. 2011 सालच्या वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण मिळून फक्त 14 संघ आणि 2015 आणि 2019 सालच्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत 10 संघांमध्येचं अटीतटीची स्पर्धा बघण्यास मिळालेली होती.

t20 world cup team

दरम्यान, अहवालात असेही म्हणण्यात आले आहे की, हा खेळ ऑलिम्पिकमध्ये आणण्याच्या दृष्टीने बीसीसीआयने ईसीबीला पाठिंबा दर्शविलेला आहे, परंतु भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडून अद्याप याबाबत काहीच शिक्कामोर्तब झालेले नाही आहे. दुसरीकडे पहायचं झाले तर, टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमधील सर्वात जास्त वेळा यश संपादन केलेल्या संघाबद्दल बोलायचे झाले तर वेस्ट इंडिजने संघाने  आजपर्यंत सर्वाधिक अशी दोन विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. याशिवाय भारत, इंग्लंड, श्रीलंका आणि पाकिस्तान या संघांनी सुद्धा एकदा विजेतेपदावर नाव कोरले आहे. वेस्ट इंडिज टीमने डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखाली रोमांचक झालेल्या सामन्यामध्ये इंग्लंडचा दारूण पराभव करून 2016 मधील टी-20 वर्ल्ड कपचे विजेतेपद आपल्या नावे केले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी आयसीसी  कायम प्रयत्नशील असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून टी-20 वर्ल्ड कपमध्ये 20 वेगवेगळे संघ सामील करण्याची परवानगी देण्याचा आयसीसी विचार करत आहे. या योजनेची अंमलबजावणी 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -

Most Popular