HomeMarathikonkanरत्नागिरी-नागपूर महामार्गावर अज्ञात वाहनाची धडक बसून सांबराचा मृत्यू

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अज्ञात वाहनाची धडक बसून सांबराचा मृत्यू

सांबराच्या चेहऱ्याला आणि डोक्याला जबर मारला लागला,

रत्नागिरी नागपूर महामार्गावरील करंजरी येथे अज्ञात वाहनाची धडक बसून सांबराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच वनविभगाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि मृत सांबराची पाहणी करून पंचनामा केला. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (07 डिसेंबर 2025) रात्री 12.30 च्या सुमारास ही रत्नागिरी महामार्गावर करंजरी येते अज्ञात वाहनाने सांबराला जोराची धडक दिली. गाडी वेगात असल्यामुळे सांबराच्या चेहऱ्याला आणि डोक्याला जबर मारला लागला सांबराचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुखचे वनपाल सागर गोसावी, दाभोळचे वनरक्षक सुप्रिया काळे, साखरपा वनरक्षक सहयोक कराडे, फुणगूस वनरक्षक आकाश कडुकर, आरवली वनरक्षक सुरज तेली आदिंनी तात्काळ घटनास्थळी जावून मृत सांबराची पाहणी केली व पंचनामा केला. पुढील कार्यवाही वनविभागाकडून सुरू.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments