HomeMarathikonkanखोदाई दराचा भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाला विळखा रत्नागिरी शहरातील काम रखडले

खोदाई दराचा भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाला विळखा रत्नागिरी शहरातील काम रखडले

शहराच्या एकूण ४८ किलोमीटर लांबीच्या वीजवाहिन्या भूमिगत केल्या जाणार आहेत.

रत्नागिरी शहराच्या मुख्य भागातील महत्त्वाचा उच्चदाब आणि लघुदाब वाहिन्यांचा नव रखडला आहे. शासकीय दराप्रमाणे मीटरला १०० रुपये असा दर नवीन भूमिगत विद्युत प्रकल्प असताना पालिकेने दिलेल्या दरपत्रकाप्रमाणे मीटरला ३ हजार रुपये आहे. १० कोटींच्या या प्रकल्पाला पालिकेने खोदाईसाठीच १५ कोटी मागितले आहेत. ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’, या म्हणीप्रमाणे या प्रकल्पाची अवस्था झाल्याने तो रखडला आहे. पाच फिडर भूमिगत करून शहरातील विद्युततारांचे जाळे कमी करणारा हा प्रकल्प आहे; परंतु तो खोदाईच्या दरावरून रखडला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. महावितरण कंपनीने वीजवितरण प्रणाली अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी आखण्यात आलेला महत्त्वाकांक्षी भूमिगत वीजवाहिनी प्रकल्प आहे. महावितरणने १० कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित केला असला, तरी रत्नागिरी पालिकेने या कामासाठी तब्बल १५ कोटी ९९ लाख रुपयांचे सुधारित दरपत्रक दिल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या निधीच्या तफावतीमुळे दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय साधला जात नाही. परिणामी, शहराच्या अनेक महत्त्वाच्या भागांतील भूमिगत वाहिन्यांचे काम थांबले आहे.

प्रकल्पाची व्याप्ती आणि अपेक्षित काम हा प्रकल्प प्रामुख्याने रत्नागिरी शहरातील फिडरअंतर्गत येणाऱ्या प्रमुख क्षेत्रांसाठी निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये मारुती मंदिर, साळवी स्टॉप, नाचणे, संमित्रनगर, शहर या ठिकाणच्या फिडरचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत शहराच्या एकूण ४८ किलोमीटर लांबीच्या वीजवाहिन्या भूमिगत केल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी महावितरणने १० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित धरला 7 होता; मात्र नगरपालिकेने कामाचा तपशील आणि आवश्यक खर्चाचा आढावा घेतल्यानंतर १५ कोटी ९९ ) लाख रुपये इतका खर्च लागणार असल्याचे ‘एस्टिमेट’ महावितरणकडे सादर केले आहे. जवळपास ३० पटीहून अधिक रकमेची तफावत असल्याने १ महावितरणने या निधीला अद्याप हिरवा कंदील दाखवलेला नाही. त्यामुळे ह शहराच्या अनेक भागांत भूमिगत वीजवाहिनीचा हा प्रकल्प थांबला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments