Homekhedएकेचाळीस वर्षानंतर न्यू मांडवे धरण होणार - ना. योगेश कदम

एकेचाळीस वर्षानंतर न्यू मांडवे धरण होणार – ना. योगेश कदम

याच धरणावर २ मेगावॅटच्या वीजनिर्मितीचा प्रकल्पही प्रस्तावित आहे.

खेड तालुक्यातील न्यू मांडवे धरण प्रकल्प गेल्या ४१ वर्षापासून रखडला आहे. यामुळे किंजळे तर्फे नातू, पुरे, तळे, कुडोशी, सुकिवली या ५ गावातील शेतकऱ्याचा हिरमोड झाला आहे. ही बाब गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात निदर्शनास आणून दिली. त्यांनुसार न्यू मांडवे धरण प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री योगेश कदम यांना दिले. व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत मान्यता मिळाल्याचेही स्पष्ट केले. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. १९८३ मध्ये मूळ चरणाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर किंजळे तर्फे नातू पुरे, तळे, कुडोशी, सुकिवली या ५ गावातील जमीन ओलिताखाली आणून परिसर सुजलाम् सुफलाम् होणार होता. यामुळे खर अर्थाने आर्थिक सुबत्ता निर्माण होवून पाणीटंचाईची समस्या कायमचीच संपुष्टात निघणार होती. याच धरणावर २ मेगावॅटच्या वीजनिर्मितीचा प्रकल्पही प्रस्तावित आहे. न्यू मांडवे धरण प्रकल्पासह वीजनिर्मितीचा प्रकल्पही कागदावरच राहिल्याने ५ गावातील शेतकऱ्यांच्या भ्रमनिरास झाला आहे.

धरण रखडलेल्या न्यू मांडवे प्रकल्पाकडे लक्ष वेधण्यासाठी जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव यांनी प्रजासत्ताकदिनी ग्रामस्थांसमवेत आत्म दहनाचा इशारा दिल्यानंतरही कोकण लघुपाटबंधारे विभाग मुक गिळून गप्पच होता. या धरण प्रकल्पाबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी धरणप्रश्नी गंभीर दखल घेत प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्यात असल्याचे स्पष्ट केले. व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे या धरणाला प्रशासकीय मान्यताही प्रदान करण्यात येणार असल्याची हमी मुख्यमंत्री फड़वीस यांनी गृहराज्यमंत्र्यांना दिली आहे. यामुळे गेल्या ४१ वर्षापासून रखडलेला धरण प्रकल्प मार्गी लागल्याच्या शक्यतेने पाच गावातील ग्रामस्थ आतापासूनच सुखावले आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments