Homesindhudurgमायनिंगच्या हालचाली थांबवा ; अन्यथा जनआंदोलन

मायनिंगच्या हालचाली थांबवा ; अन्यथा जनआंदोलन

प्रकल्प झाल्यास गावाचे गावपण हरवून जाण्याची भीती आहे.

दांडेली हा निसर्गसंपन्न गाव असून तेथे मायनिंग प्रकल्प आल्यास हा गावातील भकास होऊ शकतो. त्यामुळे दांडेली गावात मायनिंग होऊ देणार नाही. शासनाने या प्रकल्पास पुढील परवाने न देता ग्रामस्थ व गावच्या हिताचा विचार करावा. मायनिंग प्रकल्पाच्या हालचाली झाल्यास ग्रामस्थांतर्फे जनआंदोलन छेडण्यात येईल. असा एल्गार दांडेली ग्रामस्थांतर्फे करण्यात आला. दरम्यान दांडेली गावात मायनिंग नकोच असा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. दांडेली गावात मायनिंग सुरु करण्या संदर्भातील तपासण्या आणि हालचाली सुरु झालेल्या आहेत. याची पुरेपूर माहिती मिळताच आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांतर्फे प्रकल्पाला विरोध करण्यासाठी विशेष चर्चा करण्यात आली. याविषयी ग्रामस्थांची एकजूट दिसून आली. प्रकल्प झाल्यास गावाचे गावपण हरवून जाण्याची भीती आहे. मायनिंग सारख्या प्रदूषणकारी प्रकल्पाला पंचकोशीतील सर्व गावांचा विरोध असल्याने दांडेलीतही मायनिंग तपासणी मायनिंग संदर्भात बोअरिंग कामास आमचा विरोधच राहील. विरोध असतानाही पुढे अशा तपासण्या उत्खनन झाल्यास तथा परिणामी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म अधिकारी मायनिंग कंपनी जबाबदार राहील. असा इशाराही ग्रामस्थांतर्फे देण्यात आला. कोंडरे गाव हा इकोसेन्सिटिव्ह गाव म्हणून घोषित केला आहे.

मात्र याठिकाणी गायनिंग तपासणीसाठी बोअरिंग होतेच कसे असाही प्रश्न बैठकीत ग्रामस्थांनी उपस्थित केला. दरम्यान याबाबतचे पत्र सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म अधिकारी विभागाला देण्यात आले आहे. या प्रकारावर गांभीयनि लक्ष देऊन मायनिंग कंपनीकडून होणारे बोअरिंग थांबवून ग्रामस्थांना न्याय द्यावा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे. दांडेली व त्या परिसरातील कोंडुरे, आरोस, साटेली, पाडलोस, असे इतर दशक्रोशीतील गाव हे निसर्गसंपन्न आहेत.त्या दांडलीत मायनिंग सारखे प्रकल्प होतील, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते या गावामध्ये काजूकोकम, सुपारी ही फळपिके मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आता मायनिंग सारख्या राक्षसाची नजर या गावावर पडली, अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

आरोग्य निसर्ग बागायती धोक्यात। – गावामध्ये मायनिंगसारखा प्रदूषणकारी प्रकल्प सुरु झाल्यास निसर्ग नष्ट होणार आहे. भविष्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. प्रदूषणामुळे विविध गंभीर आजार निर्माण होतील. तसेच सदर जागेत असणारे काजू, आंबा, नारळ, सुपारी यासारखी झाडे तोडल्यामुळे शेतकऱ्यांचे उपजिविकेचे साधन संपुष्टात येणार आहे.

कृती समितीची स्थापना ! – या सभेत २५ जणांची मायनिंग विरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी श्रीकृष्ण वामन स्रोत तर उपाध्यक्षपदी हेमंत कामत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या व्यतिरिक्त तानाजी खोत, योगेश नाईक, महादेव पांगम्, नीलेश आरोलकर, कृष्णा पालयेकर, प्रदीप कागत, प्रसाद कामत, संदीप माणगावकर, प्रथमेश कर्पे, प्रचिती मडुस्कर, सरिता मोरजकर, रुपाली मोरजकर व इतरांचा समावेश समितीत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments