Homekhed'त्या' कंपनीच्या अहवालानंतर निर्णय - पालकमंत्री उदय सामंत

‘त्या’ कंपनीच्या अहवालानंतर निर्णय – पालकमंत्री उदय सामंत

कंपनीने केलेल्या चाचण्यांचा अहवाल देण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे.

लोटे येथील ‘त्या’ कंपनीला ४ नोव्हेंबरला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. कंपनीने केलेल्या चाचण्यांचा अहवाल देण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे. त्याचा अहवाल सकारात्मक असला आणि त्यानंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळाला हे उत्पादन प्रदूषणकारी वाटले, त्याने कोकणाच्या निसर्गाला धक्का बसेल, असा निष्कर्ष निघाला तर शासन म्हणून आम्ही त्यावर बंदी घालू, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. चिपळुणातील शिवसेनेच्या (शिंदे म्हणाले, कंपनीने दिलेल्या अहवालावर गट) मेळाव्यात बोलताना सामंत तज्ज्ञ मंडळी अभ्यास करतील. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. वाटेल तशी माहिती सोशल मीडियावरून प्रसारित केली जात आहे. सातवीतला मुलगा देखील आलेल्या माहितीत थोडेसे वाढवून पुढे पाठवत आहे. काही जणांनी तर उदय सामंताची या कंपनीत भागीदारी असल्याचा जावईशोध लावला.

अशा कंपन्यांमध्ये भागिदारी करण्याइतपत खालच्या वृत्तीचा नाही. लोटे औद्योगिक वसाहतीमधील ‘त्या’ कंपनीने अजून उत्पादन सुरू केलेले नाही. त्यांच्याकडे अजून चाचण्या सुरू आहेत. त्याबाबतचा अहवाल देण्याची नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांना दिली “आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर त्या विषयीचा निर्णय घेतला जाईल. विविध उत्पादनांमध्ये वापरले जाणारे रसायन लक्ष्मी ऑरगॅनिक ‘त्या’ कंपनीमध्ये तयार केले जाणार आहे. ते इटलीमध्ये प्रतिबंधित करण्यात आले आहे, असे सामंत यानी सांगितले.

हे उदयोन्मुख प्रदूषक – भारतात उदयोन्मुख प्रदूषक या वर्गवारीमध्ये अशा उत्पादनांना परवानगी दिली जाते. देशात अनेक ठिकाणी ती याआधीही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘त्या’ कंपनीला परवानगी दिली आहे. अर्थात त्यांनी अजून उत्पादन घेतलेले नाही. या कंपनीने केवळ आपल्या उत्पादनासाठी चाचण्या घेतल्या आहेत. असेही सामंत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments