HomeMaharashtra Newsठाकरे बधूची युतीची घोषणा ! चुकाल तर संपाल म्हणत मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणाऱ्यांचा...

ठाकरे बधूची युतीची घोषणा ! चुकाल तर संपाल म्हणत मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणाऱ्यांचा राजकीय खात्मा करण्याचा निर्धार

सारे कुटुंबिय त्यांच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच आनंदात होते.

या युतीची घोषणा होताच संपुर्ण महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान युतीच्या घोषणेच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोन्ही ठाकरेंचे कुटुंब एकत्र आलेले पहायला मिळाले.

भावनिक क्षण – या युतीची घोषणा बुधवारी जाहीर होणार हे मंगळवारीच स्पष्ट झाले होते. ठाकरे कुटुंबासाठी तब्बल २० वर्षांनंतर दोन भाऊ राजकीयदृष्ट्या एकत्र येत असल्याने भावनिक वातावरण होते. सारे कुटुंबिय त्यांच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच आनंदात होते.

कुंदाताईंनी केले औक्षण – राज ठाकरे युतीच्या पत्रकार परिषदेसाठी जेव्हा त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावरून बाहेर पडले त्याआधी त्यांच्या. मातोश्री कुंदाताई ठाकरे यांनी त्यांचे औक्षण केले. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सो. शर्मिला ठाकरे, सुपुत्र अमित ठाकरे आणि सून सौ. मिताली आणि कन्या उर्वशी असे सारे कुटुंब एकत्र बाहेर पडले. स्मृतीस्थळावर अभिवादन हे सारे कुटुंब शिवाजीपार्क मैदानाजवळील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी नतमस्तक होण्यासाठी दाखल झाले. त्याचवेळी मातोश्रीवरून उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, चिरंजीव आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हे देखील आले. विशेष म्हणजे दोन ठाकरे बंधु एकत्र यावेत यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे त्यांचे चंदूमामा वैद्य हे देखील आले होते. चंदूमामांच्या डोळयातून ओघळणारे आंनंदाश्रू थांबत नव्हते.

एका कारने रवाना – स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे हे एका कारमधून वरळीकडे निघाले. तर दुसऱ्या कारमधून त्यांचे कुटुंबिय निघाले. कुटुंबियांसमवेत बाळा नांदगावकर, संदिप देशपांडे, आ. मिलिंद नार्वेकर, खा. संजय राऊत हे देखील हॉटेल ब्ल्युसी मध्ये दाखल झाले.

पत्रकार परिषदेत घोषणा – पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी युतीची औपचारिक घोषणा केली. शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांची युती झाल्याची घोषणा मी करतो आहे असे राज ठाकरे म्हणताच व्यासपीठावर सोबत बसलेल्या उद्धव ठाकरेंसह, सर्वांनी आणि पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यानी टाळयांच्या गजरात स्वागत केले.

वादापेक्षा महाराष्ट्र मोठा – यावेळी राज ठाकरे म्हणाले की, कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे अस मी एका मुलाखतीत म्हणालो होतो. मुलाखतीतील त्या वाक्यापासून एकत्र येण्याची सुरुवात झाली. कोण किती जागा लढणार, आकडा काय हे सांगणार नाही. सध्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ही युती झाली आहे. उर्वरित महापालिकांमध्येही ती होईल. तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू.

मुलं पळवणारी टोळी – महाराष्ट्रात लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या पळतायत. त्यात सध्या दोन टोळ्या आणखी अॅड झाल्यात. ते ‘राजकीय पक्षातली मुलं पळवात. जे निवडणुका लढवणार आहेत. त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल. ती कधी भरायची आणि कशी ते कळवलं जाईल. आज एकच सांगेन की बरेच दिवस प्रतिक्षा करत होता ती शिवसेना आणि मनसेची युती झाली हे जाहीर करतो.

उद्धव ठाकरेंचे आवाहन – तर या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी मुंबईतील मराठी म ाणसाला भावनिक आवाहन केले. ते म्हणाले की, राऊतांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली. १०७पेक्षा जास्त मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. त्याची आठवण आज होणं स्वाभाविक आहे. आम्ही आज ठाकरे बंधू इथे बसलो आहोत. अख्ख ठाकरे घराणं त्यावेळी संघर्ष करत होतं. मुंबई म हाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईतच मराठी माणसाच्या उरावर नाचायला लागले. त्यावेळी न्याय हक्कासाठी शिवसेना प्रम खांनी शिवसेनेला जन्म दिला. पुढच्या खान वर्षी शिवसेनेला ६० वर्षे होतील. आज पुन्हा आपण मुंबईचे लचके तोडणं, चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळी ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी- दिल्लीत जे बसलेत त्यांचे आहेत. आता जर आपण भांडत राहिलो तर जो संघर्ष झाला, हुतात्मा स्मारक आहे त्याचा अपमान आहे.

मराठीचा वसा टाकू नका – एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. यापुढे मुंबई आणि महाराष्ट्रावरती कपटी कारस्थानाने मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन मैदानात उतरलोय. सर्वांना विनंती करतोय की, विधानसभेवेळी भाजपने अपप्रचार केला की बटेंगे तो कटेंगे… तसं आता फुटाल तर संपून जाल, तुटू नका फूटू नका, मराठीचा वसा टाकू नका. असा संदेश युतीच्यावतीने देतो आहे. मराठी माणूस कुणाच्या वाटेला जात नाही. पण त्याच्या वाटेला येणाऱ्याला परत जाऊ देत नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी इशारा दिला.. चुकाल तर संपाल अस भावनिक आवाहनही त्यांनी केले. ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेसाठी पत्रकार परिषद आयोजित केलेल्या ठिकाणी व्यासपीठावर बॅनरवर फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला होता. व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत यांच्यासाठी स्पेशल खुर्ची ठेवण्यात आली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments