HomeRatnagiriवाहन क्रमांकाची नवीन मालिका आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी 2 जानेवारीपर्यंत अर्ज करा

वाहन क्रमांकाची नवीन मालिका आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी 2 जानेवारीपर्यंत अर्ज करा

परिवहन वाहनांची यादी 2 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात 2 जानेवारी रोजी दुचाकी वाहनांसाठी MH-08-BL-0001 ते MH-08-BL-9999 ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. ज्या दुचाकी/चारचाकी/परिवहन वाहन मालकांना नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहीत शुल्क (तीनपट शुल्क) भरुन हवे असतील त्यांनी 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे. वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी गर्दी होते. त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व नागरिकांनाही त्याचा त्रास होतो. हा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास सुलभतेने तो मिळावा यासाठी सदर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इच्छुकांनी आपला अर्ज उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, पॅनकार्ड, ओळखपत्र यांच्या साक्षांकित प्रतीसह DY RTO RATNAGIRI यांच्या नावे नॅशनलाईज/शेड्युल बँकेचा रत्नागिरी येथील डीडी जमा करावा. अर्जासोबत फोटो ओळखपत्र केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४ तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५ अ मध्ये विहीत केल्या पत्त्याच्या पुराव्यांनी ( आधारकार्ड, आधारकार्डला लिक असलेला मोबाईल क्रमांक, टेलीफोन बिल) साक्षांकित प्रत सादर करावी.

दुचाकी/चारचाकी/परिवहन वाहनांची यादी 2 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. यादीमधील एकाच क्रमांकासाठी दोन किंवा जास्त अर्ज असल्यास यादीतील अर्जदारांना लिलावाकरिता जर जास्त रक्कमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी 5 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत सीलबंद पाकीटात कार्यालयात जमा करावा व त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कक्षात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधित अर्जदार) लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विर्निदिष्ट शुल्कापेक्षा जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकांपासून 180 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकार जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी भरलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments