उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा राजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त ओपन अंडरआर्म टर्फ क्रिकेट स्पर्धेचा थरार ३ आणि ४ जानेवारी २०२६ रोजी नाचणे येथील शिवरुद्र टर्फवर रंगणार आहे. रत्नागिरीतील क्रीडाप्रेमी ‘क्रिस्टल ग्रुप’च्या वतीने ‘क्रिस्टल चषक २०२६’ ही क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (ता. ३) दुपारी ३ वाजता रत्नागिरीतील दिग्गज क्रिकेटपटूंच्या उपस्थितीत दिमाखात पार पडणार आहे. नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच क्रिकेट प्रेमींसाठी क्रिस्टल ग्रुपने क्रीडा मेजवानी उपलब्ध करून दिली आहे. रत्नागिरीच्या क्रिकेट इतिहासात म ोलाचे योगदान देणारे मान्यवर खेळाडू उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये मुंबईच्या सेंट्रल रेल्वेकडून रणजी खेळलेले आणि ७० व्या वर्षीही कोचिंग देणारे हरिष लाडे, रमाकांत आचरेकर सरांचे शिष्य व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव दिपक मोरे, ‘यंगबॉईज’चे हुकमी फलंदाज सुरेश जैन, जिल्ह्याचे वेगवान गोलंदाज सईद मुकादम, अष्टपैलू खेळाडू दिवाकर मयेकर आणि महिला क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या योगिता महाकाळ यांचा समावेश आहे. या ज्येष्ठ खेळाडूंच्या उपस्थितीमुळे नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे.
स्पर्धेचे असे ही वैशिष्टय : आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली संघाचे प्रशिक्षक आणि प्रसिध्द क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी क्रिस्टल चषक स्पर्धेला व्हिडिओद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. TennisCricket.in यावर या स्पर्धेतील सर्व सामने लाईव्ह दाखवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोची पंच परीक्षा उत्तीर्ण झालेले पंच या स्पर्धेत असणार आहेत.
महिला क्रिकेट संघाची शो मॅच : रविवारी (ता. ४) सायंकाळी ७वाजता रत्नागिरीतील महिलांच्या दोन संघात प्रदर्शनीय सामना खेळवण्यात येणार आहे. श्री साई स्पोर्टस् आणि अश्वमेध क्रिकेट अॅकॅडमी यांच्यात हा सामना रंगणार आहे. या सामन्याला राजेश सोहोनी आणि कंपनी तसेच एंजल ब्रॉकिंग्स कडुन विशेष ट्रॉफीज देण्यात येतील.
बक्षिसांची लयलूट – विजेत्या संघांना भरघोस रोख बक्षिसे आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे. विजेत्या संघाला २५,५५५ रुपये व चषक, उप विजयी संघाला १५,५५५ रुपये व चषक देण्यात येईल. मॅन ऑफ दि सीरिजसाठी रोख २,५५५ रुपये आणि चषक, बॅट, ब्लूटूथ स्पीकर यासह इतर वैयक्तिक बक्षीसेही दिली जाणार आहेत. सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाला प्रत्येकी १,१११ रुपये व चषक प्रत्येक सामन्यात ‘मॅन ऑफ दि मॅच’ चा पुरस्कार देण्यात येणार असून स्पोर्ट जर्कीन आणि रत्नविहार गिफ्ट हॅम्पर चे नियोजन असणार आहे.
