थिबा राजाकालीन बुद्धविहारासाठी आरक्षित असलेल्या १७.५० गुंठे जागेवर सुरू असलेले कम्युनिटी सेंटरचे बांधकाम तत्काळ रद्द करण्यात यावे, तसेच ही संपूर्ण आरक्षित जागा बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावी, या दोन मुख्य मागण्या होत्या. मात्र, निवेदन देऊनही दोन महिने उलटून गेले तरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही लेखी कार्यवाही अथवा उत्तर संघर्ष समितीला मिळालेले नाही. आठ दिवसांत निर्णय न झाल्यास प्रजासत्ताक दिनी साखळी उपोषणाचा इशारा थिबाराजा संघर्ष समितीने दिला आहे. थिबा राजाकालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्यावतीने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यापूर्वी २७ ऑक्टोबर २०२५ ला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाद्वारे दोन प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. थिबा राजाकालीन बुद्धविहारासाठी आरक्षित असलेल्या १७.५० गुंठे
जागेवर सुरू असलेले कम्युनिटी सेंटरचे बांधकाम तत्काळ रद्द करण्यात यावे, तसेच ही संपूर्ण आरक्षित जागा बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावी, या दोन मुख्य मागण्या होत्या. मात्र, त्याला दोन महिने झाले तरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतेही मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनावर नेमकी काय कार्यवाही करण्यात आली, याबाबत विचारणा केली. यावेळी निवासी जिल्हाधिकारी यांनी आठ दिवसांच्या आत माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात एल. व्ही. पवार, किशोर पवार, अमोल जाधव, सुनील आंबुलकर, दीपक जाधव, प्रकाश पवार, राजेंद्र कांबळे, अजित जाधव, प्रदीप पवार, तुषार जाधव, मिलिंद सावंत, राजन जाधव, शिवराम कदम आर्दीचा समावेश होता.
