HomeRatnagiriजिल्ह्यात नवीन २१ रेशन दुकानांना मंजुरी जिल्हा पुरवठा विभाग

जिल्ह्यात नवीन २१ रेशन दुकानांना मंजुरी जिल्हा पुरवठा विभाग

रत्नागिरी तालुका आणि खेड तालुक्यातील दुकानांना मंजुरी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यात नव्याने रेशन दुकान मंजुरीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे आले होते. त्यापैकी २१ नव्या रेशनदुकांनाना मंजुरी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात ९४९ रेशन दुकाने सुरू असून, त्यात आणखी २१ रेशन दुकाने वाढणार आहेत. सर्वाधिक मंजुरी रत्नागिरी तालुका आणि खेड तालुक्यातील दुकानांना मंजुरी देण्यात आली आहे. मंडणगडात एकाच ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब, अंत्योदयमधील लाभार्थ्यांना वेळेत, सुरळीत धान्य देण्यात यावे म्हणून जिल्हा पुरवठा विभाग काम करत आहे. जिल्ह्यात रास्त भाव दुकानांसाठी २०२५ साठी अर्ज मागवण्यात आले होते.

त्यापैकी २१ अर्जाना मंजुरी देण्यात आली असून, लवकरच नव्याने मंजुरी झालेली रेशन दुकाने लवकरच सुरू होणार आहेत. रत्नागिरी तालुक्यातील देऊड, पिंळवाडी २, चवे ३, फणसवणे (गुरववाडी), तुरळ (हरेकरवाडी) प्रत्येक एक, मंडणगडात उंबरशेत, राजापूर खरवते, चिपळूणमध्ये मार्गताम्हाणे बुद्रुक, दापोली तालुक्यात पणदेरी, दापोली ३, शिरसोली येथे प्रत्येक एक, गुहागरात निगुंडळ, असोर येथे प्रत्येकी एक, खेड तालुक्यात भिलारे आयनी, खोपी, तुळशी बु., करटेल येथे प्रत्येक एक, कशेड येथे दोन असे एकूण २१ नव्या रेशन दुकानांना मंजुरी देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments