Homekhedkhedनिविदा वादातही पुलाच्या जोडरस्त्याला गती मुरादपूर-पेठमाप मार्ग

निविदा वादातही पुलाच्या जोडरस्त्याला गती मुरादपूर-पेठमाप मार्ग

हा मार्ग पर्यायी ठरणार असल्याने वाहतूक व्यवस्थेच्यादृष्टीने हा पूल महत्त्वाचा आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या मुरादपूर-पेठमाप पुलाच्या जोडरस्त्याचे काम अनेक महिने थांबले आहे. सुमारे सहा कोटी रुपये खर्चातून जोडरस्ता उभारला जाणार आहे. यासाठी आठ निविदा आल्या होत्या. या प्रक्रियेत अपात्र निविदा पात्र ठरवत प्रशासनाने बेकायदेशीर व नियमबाह्य कारभार केल्याची तक्रार माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीला न जुमानता जोडरस्त्याचे हे काम पुन्हा सुरू केले आहे. शहरातील पेठमाप मुरादपूर पुलाच्या जोडरस्त्याचे काम ५.६१ कोटींचे आहे. या कामासाठी १६ जुलै २०२५ ला निविदा प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार एकूण नऊ निविदा प्राप्त झाल्या होत्या. सुरुवातीला तांत्रिक पडताळणीत बहुतांश निविदा अपात्र ठरत होत्या; मात्र त्यानंतर पालिका मुख्याधिकारी आणि निविदा समितीने सर्वच निविदा पात्र ठरवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय शासनाच्या निविदा मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात असल्याचा आरोप मुकादम यांनी केला.

निविदेतील स्टॅम्प, काँक्रिटिकरणाच्या कामाचा अनुभवाचा दाखला, स्वतःच्या मालकीच्या मशीनरीची अट असतानाही त्या अटी परस्पर शिथिल केल्या. मुळात निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील अटीशर्ती बदलणे किंवा रद्द करणे हा अधिकार मुख्याधिकारी अथवा निविदा समितीला नाही. तरीही मनमानी पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला. निविदा प्रक्रियेत पारदर्शकता न राखता काही निवडक ठेकेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी अटी बदलण्यात आल्या. त्यामुळे ही प्रक्रिया संशयास्पद असून, गैरव्यवहार झाल्याची शक्यता मुकादम यांनी व्यक्त केली होती; मात्र या मागणीला बगल देत या पुलाच्या जोडरस्त्याचे काम सुरू झाले आहे. पुलाच्या पेठमाप व मुरादपूर या दोन्ही बाजूने एकाचवेळी जोडरस्त्याचे काम सुरू केले आहे. शहराच्यादृष्टीने हा मार्ग पर्यायी ठरणार असल्याने वाहतूक व्यवस्थेच्यादृष्टीने हा पूल महत्त्वाचा आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments