रत्नागिरी शहरात बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांबाबत सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. एखादा गुन्हा घडल्यानंतर संबंधित परिसरात सीसीटिव्ही नसणे अथवा ते बंद असल्याचे वारंवार प्रकार समोर येत होते. या सर्व प्रकाराची रत्नागिरी पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश आव्हाड यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार सीसीटिव्ही बसवणाऱ्या कंपनीच्या दोघा संचालकांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आता आहे. हेमंत गोपाळ धवानी व कुलदीप एराम (संचालक, प्रोटोकॉल वन इट लॅब्स प्रा. लि.) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध ४३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा ठपकाही पोलिसांकडून ठेवण्यात आला आहे. रजागिरी पोलिसांकडून शहरात सीसीटिव्ही बसवण्यासाठी १७ जानेवारी २०२३ ते २३ डिसेंबर २०२५ या काळात स्नागिरी सीटी सर्विलेन्स प्रोजेक्ट राबवण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार शहरात सीसीटिव्ही बसवणे व त्यांची देखभाल करणे आदींचा समावेश होता. हे सीसीटिव्ही बसवणे व त्यांची देखभाल करणे, हे काम प्रोटोकॉल वन इट लेब्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले होते. कंपनीला घातून दिलेल्या अटी व शर्थचि कंपनीकडून पातन करण्यात जाले नाही तसेस सीसीटीव्ही बंद ठेवून शासकीय कामात अठपळा निर्माण केला, असा आरोप पोलिसांकडून ठेवण्यात आला आहे.
