HomeRatnagiriदहावी परीक्षेला प्रारंभ सीसीटीव्हीची नजर

दहावी परीक्षेला प्रारंभ सीसीटीव्हीची नजर

विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी वेळापत्रकात आवश्यक अंतर ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे दहावीची परीक्षा शुक्रवारपासून (ता. २०) ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. कोकण विभागीय मंडळांतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून एकूण २५ हजार ७७७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, १२४ मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा आली आहे. आयोजित करण्यात रत्नागिरी जिल्ह्यात १७ हजार ५४०, तर सिंधुदुर्गात ८ हजार २३७विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. विभागातील ६५० माध्यमिक शाळांचा या परीक्षेत सहभाग असून, २२ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीसीटीव्ही नसलेल्या चार परीक्षा केंद्रांवर विशेष नियुक्त्या करण्यात येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी वेळापत्रकात आवश्यक अंतर ठेवण्यात आले आहे. परीक्षेच्या कालावधीत समुपदेशनाची सुविधा तसेच हेल्पलाईन कार्यरत ठेवण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर किमान अर्धा तास आधी उपस्थित राहावे, अशी सूचना देण्यात आली आहे. सकाळी १०.३० व दुपारी २.३० वाजता परीक्षार्थ्यांनी दालनात उपस्थित राहणे आवश्यक राहील. गतवर्षाप्रमाणे यंदाही प्रश्नपत्रिका वाचनासाठी अतिरिक्त दहा मिनिटांचा अवधी देण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना सवलती लागू राहतील. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी जनजागृती सप्ताहही राबवण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments