कशेडी घाटात कंटेनर उलटला वाहतूक ठप्प

कंटेनर आडवा झाल्यामुळे मुंबईकडे जाणारी संपूर्ण लेन बंद पडली.

Must read

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाट परिसरात बुधवारी सकाळी शीतपेयांची वाहतूक करणारा कंटेनर उलटल्याने महामार्गावरील एक लेन पूर्णपणे बंद झाली आहे. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनरचालक राम आचल मिंद (रा. उत्तर प्रदेश) हा कंटेनरने लोटे येथून भिवंडी-वाडा दिशेने जात होते. कशेडी घाटातील पोलादपूरजवळील चोळई गावाजवळ पोहोचताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या मधोमध उलटला. कंटेनरमधील शीतपेयांच्या बाटल्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात पसरल्याचे पाहावयास मिळत होते. कंटेनर आडवा झाल्यामुळे मुंबईकडे जाणारी संपूर्ण लेन बंद पडली. या अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मंगेश मुंढे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

तसेच कशेडी महामार्ग पोलिसांचाही ताफा तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी खेड-पोलादपूर दिशेने जाणारी वाहतूक एका बाजूच्या लेनवर वळवून सुरळीत सुरू ठेवली. त्यामुळे महामार्गावर मोठा अडथळा निर्माण होण्यापासून बचाव झाला. दरम्यान, महामार्गावर पडलेल्या शीतपेयांच्या बाटल्या बाजूला करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, क्रेनच्या साहाय्याने कंटेनर रस्त्यापासून हटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कंटेनर हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.

वाहनचालकांचे हाल – कंटेनर उलटल्याने कशेडी घाट परिसरातील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना मात्र वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना मात्र चांगलीच कसरत करावी लागली.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article