HomeRatnagiriएमआयडीसीच्या उपअभियंत्याची बनावट सही अन् पत्राद्वारे बदनामी

एमआयडीसीच्या उपअभियंत्याची बनावट सही अन् पत्राद्वारे बदनामी

फिर्यादीने पदोन्नती मिळवण्यासाठी डुप्लिकेट प्रमाणपत्र तयार केली.

मिरजोळे एमआयडीसी कार्यालयात उपअभियंता स्थापत्य या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यााच्या नावाचा आणि सहिचा गैरवापर करुन अज्ञाताने फिर्यादीच्या लौकिकास बाधा आणल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 23 डिसेंबर 2025 रोजी घडली आहे. याप्रकरणी उपअभियंता भास्करराव निवृत्ती पाटील (54, रा. एमआयडीसी कॉलनी उद्यमनगर, रत्नागिरी) यांनी बुधवार 28 जानेवारी रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताने त्यांच्या नावाचा व सहिचा गैरवापर करुन एक अर्ज तयार केला. त्यामध्ये फिर्यादीने पदोन्नती मिळवण्यासाठी डुप्लिकेट प्रमाणपत्र तयार केली. तसेच फिर्यादी विरोधात वेळोवेळी झालेल्या तक्रारी फिर्यादीने आपल्या राजकीय संपर्काचा गैरवापर करुन त्या तक्रारींवर कार्यवाही होउ नयेत यासाठी अडथळे निर्माण केले.

तसेच फिर्यादीने शासकिय निषमांचे उल्लंघन करुन रत्नागिरी व विमाननगर पूणे येथे महामंडळाचे दोन प्लॉट मिळवले, दुसरी जागा घेताना फिर्यादीने आपल्याकडे कोणतीही जागा नसल्याची खोटी स्वयंघोषणा करुन, जागा मिळवली. त्याचप्रमाणे फिर्यादीने राजकीय ओळखीचा वापर करुन वरिष्ठ अधिकारी तसेच अधिनस्त कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला. फिर्यादीच्या या वर्तनामुळे संस्थेता, सहकाऱ्यांना तसेच जनसामान्यांच्या विश्वाराजा धक्का पोहचला आहे. त्याबद्दल मनापासून दिलगीरी व्यक्त करतो, असे त्या अर्जात नमूद करण्यात आले आहे. अज्ञाताने फिर्यादी भास्करराव पाटील यांच्या लौकिकास बाधा यावी या उद्देशाने हे बनावटीकरण करुन्, ती अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई या कार्यालयात देउन फिर्यादीच्या तोकिकास बाधा आणली आहे. या प्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments