कोकणातील महत्त्वाच्या जलदुर्गापैकी हर्णे येथील ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्याची निवड जागतिक वारसास्थळांमध्ये झालेली आहे. ही बाब अभिमानास्पद असली, तरीही प्रत्यक्षात मात्र त्या जलदुर्गाची दुरवस्था झालेली आहे. तटबंदीवर झाडेझुडपे वाढली असून, पर्यटकांसाठी तिथे सोयी-सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे जागतिकस्तरावर नोंदला गेलेला हा ऐतिहासिक वारसा संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. सुवर्णदुर्ग किल्ल्याचे वेगळेपण निश्चितच पर्यटनाला चालना देणारे असेच आहे; मात्र हा किल्ला आजही संवर्धनाच्यादृष्टीने दुर्लक्षितच आहे. यंदाच्या पावसाळ्यात समुद्राच्या लाटांच्या मान्यात किल्ल्याच्या बाहेरील बुरुजांचे नुकसान झालेले आहे, तसेच दोन्ही बाजूने भिंतींवर प्रचंड प्रमाणात मोठमोठी झाडेझुडपे वाढलेली आहेत. वनस्पतीच्या मुळांमुळे तटबंदीच्या दगडांमध्ये भेगा पडण्याची शक्यता असून, भविष्यात ही मजबूत तटबंदी ढासळण्याचा धोका निर्माण झालेला आहे. आतील भागातील भिंती झाडीमुळे पूर्णपणे दिसेनाशा झालेल्या आहेत. त्यामुळे किल्ल्याच्या पर्यटनाचा साज हरक्त आहे.
कला असूयालय मोहीकाळ विशेष किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी शासनाने एका व्यक्तीची नियुक्ती जातेः मात्र आतील भागाची स्वच्छता समाधानकारक नसल्याची तक्रार स्थानिक आणि गडप्रेमींकडून केली जात आहे. पावसाळा संपल्यानंतर या किल्ल्यावरील पर्यटन मोठ्या प्रमाणात सुरू होते. दरवर्षी हजारो पर्यटक येथे दाखल होतात. सध्या ख्रिसमस सुटीतही पर्यटकांच्या रांगा लागतील. याद्वारे स्थानिकांनाही रोजगार मिळत आहे; परंतु या किल्ल्यावर आवश्यक सुविधाच दिल्या गेल्या नसल्याचे दिसून येते. याकडे शासनाने गांभीयनि लक्ष दिले पाहिजे. सुवर्णदुर्ग किल्ला भारतीय पुरातत्व विभागाच्या संरक्षणात असला तरी राज्यशासनानेही तितकेच लक्ष देऊन पर्यटनाला प्रोत्साहन दिले पाहिजे जेणेकरून ऐतिहासिक वारसा जपण्याबरोबरच स्थानिकांच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याबरोबरच देशाचं नावदेखील उंचावेल.
सुवर्णदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे इ. स. १६६० च्या आसपास बांधल्याची नोंद आहे. मराठा नौदलाच्या विस्तारात आणि सुरक्षाव्यवस्थेत या किल्ल्याचे महत्त्व अधिक होते. किल्ल्याचे नियंत्रण शिवाजी महाराजांनंतर कान्होजी आंग्रे यांच्याकडे होते. हा किल्ला आंग्रे यांच्या समुद्री संरक्षण किल्ल्यांचे मुख्य केंद्र होता. हा किल्ला समुद्रात जवळच्या बेटावर उभारलेला आहे. याच किल्ल्यावरून आंग्रे यांनी अनेक परकीय जहाजांना आव्हान दिले होते, तसेच आग्नेय सागरावर मराठ्यांची पकड मजबूत करण्यासाठी या किल्ल्याचे महत्त्व अधिक आहे. किल्ल्याच्या भिंती भक्कम दगडांच्या असून, आजही मजबुती जाणवते. किल्ल्यातून समुद्रावर टेहळणी करण्यासाठी उत्तम स्थान आहे. किल्ल्यावर बुरुज आणि गंजत अस्तव्यस्त तोफा दिसून येतात. किल्ल्याचे भौगोलिक स्थान लक्षात घेता आजही देशाच्या सीमांवर नजर रोखून आहेत.
बोटींची प्रतीक्षा कालावधी वाढविण्याची गरज – किल्ल्याचा परिसर मोठा असल्याने अर्ध्या तासात संपूर्ण किल्ला पाहून घेणे शक्य होत नाही. पर्यटकांना घेऊन येणाऱ्या बोटी अर्ध्या तासात माघारी परतात, त्यामुळे पर्यटकांना किल्ला व्यवस्थित पाहता येत नाही. त्यासाठी किल्ल्याच्या आतील भागात असलेल्या मुख्य ठिकाणांच्या जागी माहितीफलक उभारले तर पर्यटकांना ठिकाणे पाहता येतील. बोटींचा प्रतीक्षा कालावधी वाढवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. मुरूड-जंजिरा किल्ल्याच्या ठिकाणी पाऊण तास वेळ फिरण्यासाठी दिला जातो. इथे मात्र तसं होत नाही. ही गोष्ट गांभीयनि पाहावी, अशी सूचना पर्यटकांकडून होत आहे.
ती ७ तळी दुर्लक्षित – सुवर्णदुर्ग किल्ल्यावर काळ्या पाषाणात खोदलेली एकूण सात गोड्या पाण्याची तळी आहेत. ती तळी आजही सुस्थितीत असली तरीही त्यांच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. सध्या या टाक्यांवर शेवाळाचे साम्राज्य पसरलेले होते. त्यांचे जतन केले तर त्यातील पाणी नियमित वापरासाठी उपयुक्त ठरू शकते.
पर्यटनाच्यादृष्टीने आवश्यक सुधारणा – भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित हा किल्ला असला तरी राज्यशासनाने पर्यटनाला चालना देण्यासाठी खालील पावले उचलणे गरजेचे आहे.वाहतूक व्यवस्था : हर्णे ते सुवर्णदुर्ग प्रवासासाठी बोटींचे निश्चित वेळापत्रक आणि ऑनलाइन बुकिंग सुविधा. सुरक्षा : प्रत्येक पर्यटकासाठी लाइफजॅकेटची सक्ती आणि बोटींची सुरक्षितता हवी नागरी सुविधा : किल्ल्याच्या परिसरात आधुनिक स्वच्छतागृहे आणि विश्रामगृहांची उभारणी करावी. माहितीफलक : किल्ल्याचा इतिहास सांगणारे मराठी आणि इंग्रजी भाषेतील स्पष्ट फलक हवेत…
