HomekonkanChiplunचिपळूण हायटेक बसस्थानकाला वाढीव निधी मिळणार : आ. निकम

चिपळूण हायटेक बसस्थानकाला वाढीव निधी मिळणार : आ. निकम

हायटेक बसस्थानक इमारत उभी न राहिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

निधीअभावी रखडलेल्या चिपळूण हायटेक बसस्थानकाच्या कामाला पुन्हा गती मिळण्याची आशा पल्ल‌वित झाली आहे. आमदार शेखर निकम यांनी नागपूर येथे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन या बसस्थानक कामासाठी वाढीव निधीची मागणी केली आहे. मंत्री ना. सरनाईक यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हायटेक इमारतीच्या पुनर्बाधणीला आगामी काळात ‘बूस्टर डोस’ मिळण्याची शक्यता आहे. २०१८ पासून चिपळूण हायटेक बस स्थानकाच्या इमारतीचे काम रडतरखडत सुरू आहे. केवळ ठेकेदार आणि आराखडा बदलापलिकडे या बसस्थानकाच्या कामात अन्य प्रगती झालेली दिसून येत नाही. त्यातच आता निधी मिळत नसल्याचे कारण पुढे करून या बांधकामाच्या आराखड्यातच बदल करून एस.टी. महामंडळाकडून उपलब्ध निधीत स्लॅबऐवजी पत्रा शेड उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. या निर्णयामुळे सध्या चिपळुणात संतापाची लाट पसरली असून माजी सभापती शौकतभाई कादम यांनी तर पूर्वीप्रमाणेच हायटेक बसस्थानक इमारत उभी न राहिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान या बसस्थानकाच्या निधीसाठी पाठपुरावा करणारे आमदार शेखर निकम यांनी या विषयाची गंभीर दखल घेत आपले प्रयत्न जोरदारपणे सुरू केले आहेत.

चिपळूण बसस्थानकाच्या हायटेक पुनर्बाधणी प्रकल्पाला गती देण्यासाठी आवश्यक असलेल्या वाढीव निधीची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी शासनाने यापूर्वी २ कोटी ८७ लाखांची तरतूद केली असून त्यानुसार काम सध्या सुरू आहे. मात्र, संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आणखी ३.५० कोटी निधी अपरिहार्य असल्याचा अहवाल परिवहन विभागामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला आहे. चिपळूण बसस्थानकाच्या नख्या इमारतीचे काम तब्बल ८ वर्षापासून रखडले असून पावसाळी अधिवेशनादरम्यान ६ जुलै २०२५ रोजी वाढीव निधीसाठी परिवहन विभागाला पत्राद्वारे विनंती करण्यात आली होती. तरीही अद्याप निधीची मंजुरी झालेली नाही. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील काम ाला वेग असला तरी, उर्वरित निधी वेळेत उपलब्ध न झाल्यास प्रकल्प अर्धवट राहाण्याची आणि नागरिकांची गैरसोय वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांची गुरुवारी भेट घेऊन वाढीव निधी तातडीने मंजूर करण्याची मागणी केली. आमदारांच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत ना. सरनाईक यांनी लवकरच निधीला मंजुरी देण्याचे आश्वासन दिले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments