HomekonkanChiplunचिपळुणात महामार्गाचे काम रोखले, अंडरपासची मागणी

चिपळुणात महामार्गाचे काम रोखले, अंडरपासची मागणी

चौपदरीकरणाच्या कामाबाबत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.

चिपळूण शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. शहरातील दीपक हॉटेलसमोरील बौद्धवाडी परिसरात अंडरपास देण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सहकाऱ्यांसह बेट घटनास्थळी जाऊन महामार्गाचे येथील काम बंद पाडले. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर बौद्धवाडी येथे अंडरपास देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. येथील उड्डाणपुलाचे काम वेगात सुरूच आहे. वाशिष्ठी नदीवरील पूल युनायटेड हायस्कूलच्या थोडे पुढे खाली उतरत असून तो तसाच पुढे आणून दीपक हॉटेलसमोरील बौद्धवाडी येथे अंडरपास देण्यात यावा, तसेच पाग नाका परिसरात उड्डाणपूल करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शिवसेना शहरप्रमुख म्हणून हा विषय सहा महिन्यांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांच्यापर्यंत पोहोचवला होता.

यासोबतच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडेही अंडरपासचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, मागणी प्रलंबित असतानाच या ठिकाणी महामार्गाच्या कामाला सुरुवात झाल्याचे लक्षात येताच नगराध्यक्ष सकपाळ यांनी आक्रमक भूमिका घेतली. या ठिकाणी अंडरपास मंजूर होईपर्यंत कोणतेही काम करू देणार नाही, असा इशारा देत त्यांनी सहकाऱ्यांसह काम बंद पाडले. महामार्ग विभागाचे अभियंता, चेतक कंपनीचे जयंती हे या वेळी उपस्थित होते. या वेळी बबलू रजपूत, धनाजी जाधव, निशांत जंगम, सुनील सकपाळ, महेश सकपाळ, राजेंद्र जाधव, महेंद्र जाधव, मंगेश जाधव, तेजस सकपाळ, पवन सकपाळ, उत्तम जाधव, अरुण जाधव, अशोक सकपाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशासनाच्या भूमिकेवर लक्ष – या महामार्ग घटनेमुळे चौपदरीकरणाच्या कामाबाबत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments