‘श्री रत्नागिरीचा महागणपती’ माघी गणेशोत्सव २२ पासून सुरवात

२८ ला सायंकाळी ४ वाजल्यापासून श्रींच्या विसर्जन मिरवणुकीने होणार आहे.

Must read

सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने ‘श्री रत्नागिरीचा महागणपती’ माघी गणेशोत्सव येत्या २२ जानेवारीपासून साजरा केला जाणार आहे. उत्सवात दररोज धार्मिक विधी, भजन-कीर्तन, सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या यंदा दुसरे वर्ष असून, २२ जानेवारीला सकाळी ७ वा. श्रींच्या विधी विधिवत प्राणप्रतिष्ठापनेने उत्सवाला प्रारंभ होणार आहे. रात्री ८ वा. बुवा उदय मेस्त्री आणि श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळाचे (केळ्ये) भजन होईल. २३ ला श्री सत्यनारायणाची महापूजा, संध्याकाळी ५ वा. हळदी-कुंकू, तर रात्री ८ वा. बुवा गौरव पांचाळ व साई प्रासादिक भजन मंडळ (फुणगूस, ता. संगमेश्वर) यांचे भजन होईल. २४ ला सकाळी ९ वा. कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांचे अथर्वशीर्ष पठण, सायंकाळी ७ वा. प्रवीण मुळ्ये यांचे गणेशपुराण सार यावर कीर्तन होईल. २५ला सकाळी ८ वा. सांबरे हॉस्पिटलच्या सहकायनि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वा. महिलांसाठी पैठणी सम्राज्ञी हा पारंपरिक खेळ आयोजित करण्यात आहे. मानाची पैठणी तसेच बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रजासत्ताकदिनी सकाळी ८ ते ११ या कालावधीत जिलेबी वाटप व रक्तदान शिबिर होईल. संध्याकाळी ७ वा. ‘स्वरसमर्पण’ हा भक्तिपर व देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम रंगणार आहे.

स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या काही गीतांचाही यात समावेश करण्यात आला आहे. २७ ला सकाळपासून धार्मिक कार्यक्रम सुरू राहणार आहेत. सकाळी ७ वा. जीजीपीएस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे अथर्वशीर्ष पठण होणार आहे. सकाळी १० वा. बुवा साहिल सावंत व श्री सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळ (उक्षी) यांचे भजन होणार आहे. दुपारी १२ वा. महाप्रसाद होईल. सायंकाळी ७ वा. महाआरतीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. बुवा उमेश लिंगायत, हरिनाम भजन मंडळ (संगमेश्वर) भजन करतील. त्यानंतर विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचे पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. २८ ला सायंकाळी ४ वाजल्यापासून श्रींच्या विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. या महाउत्सवाच्या निमित्ताने भक्तांसाठी दररोज लकी ड्रॉ निघणार असून, उत्सवकाळात दररोज संध्याकाळी विजेते जाहीर होणार आहेत. पत्रकार परिषदेला मंडळाचे अध्यक्ष योगेश मगदूम, उपाध्यक्ष अनुष्का शेलार, सचिव प्रवीण लिंगायत, सहसचिव अनघा मगदूम, खजिनदार अमोल देसाई, प्रियल जोशी उपस्थित होते.

महागणपतीवर रिल स्पर्धा – २२ ते २६ जानेवारी या कालावधीत रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एक दिवस महागणपतीसोबत आणि माझी एक चांगली सवय महागणपतीसाठी असे विषय देण्यात आले आहेत. याचे बक्षीस वितरण २७ जानेवारी रोजी होणार आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article