कणकवलीमध्ये भाजपचे मंत्री नितेश राणे यांना जबरदस्त धक्का बसला आहे. या ठिकाणी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे विजयी झाले आहेत. कणकवलीत भाजप विरुद्ध सर्वपक्षीय असं चित्रं होतं. एकप्रकारे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची देखील स्थानिक पातळीवर युती पाहायाल मिळाली होती. संदेश पारकर यांची जरी नगराध्यक्ष पदावर वर्णी लागलेली असली, तरी कणकवलीत १५ पैकी आठ जागी भाजपचे उमेदवार आतापर्यंत विजयी झालेले आहे. नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत विजय झाल्यानंतर शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांनी मीडियाला प्रतिक्रया देताना म्हटले की, आमच्या शहर विकास आघाडीत सर्व पक्षाचे नेते होते. आमदार निलेश राणे, उदय सामंत, वैभव नाईक, सतीश सावंत, राजन तेली यांच्यासह सगळ्या जनतेने आम्हाला पाठिंबा दिला आहे. म्हणून शहर विकास आघाडी या ठिकाणी जिंकलेली आहे.मी कणकवलीवासिंयाना शब्द देतो, कणकवलीत कुठतरी शाश्वत विकास आपण करूया आणि त्याचा शुभारंभ करूया, खरंतर आम्हाला अनेक आमिषं, प्रलोभनं दिली गेली.
परंतु आम्ही कणकवीलवासियांच्या सन्मानाची लढाई आम्ही लढलो आणि ही लढाई कणकवलीवासीयांनी जिंकून दाखवलेली आहे. म्हणून माझ्या सर्व कणकवलीवासीयांचा मतदारांचा मी मनापासून आभारी आहे. माझ्या नेते मंडळीचा देखील मला मोठा पाठिंबा मिळाला आहे. उद्धव ठाकरेंनी मला विरोध केला नव्हता, त्यांनी केवळ एवढंच सांगितलं होतं की एक भूमिका कुठंतरी पक्ष म्हणून राहिली पाहीजे. शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एक कणकवली पॅटर्न उदयास आलेला आहे. हा कणकवली पॅटर्न आम्ही राबवू, कणकवलीकरांच्या स्वाभिमानाची लढाई आम्ही जिंकली आहे. एक भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त कणकवलीचा आम्ही नारा दिला होता, कणकवलीकरांनी या नाऱ्यावर विश्वास दर्शवला. सगळ्या नेत्यांनी मेहनत घेतली म्हणून यश मिळालं आहे.
