Homesindhudurgनीतेश राणेंच्या 'त्या' पोस्टने खळबळ तर्कवितर्काना उधाण

नीतेश राणेंच्या ‘त्या’ पोस्टने खळबळ तर्कवितर्काना उधाण

ट्विट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

जिल्ह्यातील तीन पालिका आणि एक नगरपंचायत निवडणुकीचा धुरळा शांत होतो न होतो तोच पालकमंत्री नीतेश राणे यांनी आज ट्विट करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. ‘गप्प होतो… पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी’ अशा शब्दात त्यांनी केलेल्या या पोस्टचा रोख आपल्या पक्षातील नेत्यांवर की महायुतीवर, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. नगरपालिका निवडणुकीत खासदार नारायण राणे दूर होते; मात्र ते दूर गेले की त्यांना जाणीवपूर्वक बाजूला करण्यात आले याबाबतही चर्चा राणेंच्या ट्विटमुळे सुरू होत्या. नगरपरिषद निवडणूक निकालांनंतर मत्स्य व बंदर विकासमंत्री आणि भाजप नेते नीतेश राणे यांनी सोशल मीडियावर एक आक्रमक पोस्ट केली. ‘गप्प होतो… पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी.. पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात; पण आता ती वेळ आली आहे!’ या पोस्टमुळे कोकणच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवणारी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नीतेश राणेंचा हा रोख नेमका कोणाकडे आहे, भाजपमधील ‘नेत्यांकडे, महायुतीतील नेत्यांकडे की स्वतःचे बंधू नीलेश राणेंकडे याबाबत राजकीय वर्तुळात तर्कविर्तक मांडले जात होते.

महायुती करण्याच्या चर्चेच्या काळात मालवण नगरपालिकेत भाजपने शिवसेनेला अवघ्या चार जागा देऊ केल्या होत्या; पण आमदार नीलेश राणेंच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेनेने नगराध्यक्षपदाच्या विजयासह १० जागा जिंकल्या. एवढेच नव्हे तर पालकमंत्री नीतेश राणे यांच्या होमपिचवरील कणकवली नगरपंचायत शहर विकास आघाडीने जिंकली. या आघाडीला आमदार राणे यांनी उघड मदत केली. यातच कणकवलीत भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी आमदार नीलेश राणेंमुळे आपला पराभव झाल्याचे सांगितले होमपिचवरील कणकवली नगरपंचायत शहर विकास आघाडीने जिंकली. या आघाडीला आमदार राणे यांनी उघड मदत केली. यातच कणकवलीत भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी आमदार नीलेश राणेंमुळे आपला पराभव झाल्याचे सांगितले होते. पालकमंत्री राणे यांचे आजचे ट्विट कणकवली निकालाशी संबंधित असावे, असाही एक अंदाज चर्चिला जात आहे. प्रचार काळात आमदार नीलेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपच्या स्थानिक धोरणांवर टीका केली होती.

राणेंच्या पुढील भूमिकेकडे लक्ष – नगरपालिका निवडणुकीत पालकमंत्री राणे कमालीचे शांत होते. कणकवली आणि मालवण नगरपालिकेत भाजपचा पराभव झाल्यानंतर देखील त्यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेऊन सर्व पालिकांच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली होती; मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी ट्विट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे राणेंच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, पालकमंत्री राणे मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते त्या ट्विटबाबत काय बोलणार, याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments