Homekhedkhedमुंबई-गोवा महामार्गावर अर्धवट कामांचा डोंगर, प्रवासात अडचणी

मुंबई-गोवा महामार्गावर अर्धवट कामांचा डोंगर, प्रवासात अडचणी

या महामार्गावरील तब्बल ११ मोठमोठी कामे अद्याप अर्धवट अवस्थेत आहेत.

मागील १५ वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग येत्या एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा दावा पोकळ ठरण्याची दाट शक्यता आहे. कारण, या महामार्गावरील तब्बल ११ मोठमोठी कामे अद्याप अर्धवट अवस्थेत आहेत. त्यानंतर शिवसेनेचे गटनेते अरविंद सावंत यांनी एका पत्राद्वारे महामार्गावरील प्रलंबित कामे व त्यातील त्रुटींकडे गडकरी यांचे लक्ष वेधले. ही कामे दिलेल्या वेळेत व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पळस्पे ते कासू दरम्यानचा खारपाडा व दूरशेत पूल खड्डेमुक्त करणे, पेण रामवाडी पुलावरील पाण्याचा निचरा, पाणी तुंबण्याच्या समस्या, कासू ते इंदापूरमधील आमटेम, कोलेटी, नागोठणे, खांब, पुईगाव, कोलाड, तळवली पूल व बाह्यरस्ता अपूर्ण, वाकण नदीपूल खड्डेमुक्त करणे, इंदापूर ते वडपालेदरम्यान इंदापूर व माणगाव पुलाचे काम, मुगवली बाह्यरस्ता तळेगाव वाडी पॅचवर्क, लोणेरे पूल व बाह्यरस्ता, पोलादपूर घाटउतारावर अर्धवट स्पीडब्रेकर, वडपाले ते भोगावमधील सावित्री नदी पूल व जवळच्या रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य, पोलादपूरमध्ये पादचारी पूल, कशेडी पूल खड्डेमुक्त करणे, कशेडी बोगद्यात पाणीगळती ही कामे अर्धवट आहेत.

तसेच भरणेनाका बाह्यरस्ता वळण, खेड रेल्वेस्थानक येथील पुलाचे काम व बाह्यरस्ता, भोस्ते घाटातील गतिरोधक, आवशी पूल व बाह्यरस्ता, लोटे आणि धामणदेवी येथील खड्डेमय बाह्यरस्ता, आरवली येथील दुसरी मार्गिका, संगमेश्वर रेल्वेस्टेशन अलीकडील रस्ता, कसबा पूल, संगमेश्वर उड्डाणपुलाचे काम अपूर्ण आहे, तिथे अरुंद रस्ता आहे, बावनदी ते सोनगिरी संगमेश्वर टप्प्यात अनेक ठिकाणचे काम अर्धवट आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments