HomekonkanChiplunजनतेनेच विरोधकांचा 'निकाल' लावला, रामदास कदम यांचा विरोधकांना टोला

जनतेनेच विरोधकांचा ‘निकाल’ लावला, रामदास कदम यांचा विरोधकांना टोला

हा निकाल म्हणजे ही महानगरपालिकेच्या विजयाची नांदीच असल्याचा विश्वासही कदम यांनी व्यक्त केला.

कोकण हे स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच असल्याचे पुन्हा एकदा जनतेने दाखवून दिले आहे. नगरपरिषद निवडणुकीत जनतेनेच विरोधकांचा ‘निकाल’ लावत जागा दाखवून दिली आहे, असा वाला शिवसेना नेते रामदास कदम यानी लगावला. खेड नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर बोलताना ते म्हणाले, या निवडणुकीत मुस्लिम समाजाने सर्वाधिक सहकार्य करत ‘हम सब एक है’ हेच दाखवून देताना पुन्हा एकदा एकोपा कायम ठेवला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नगरपरिषदेत स्पष्ट बहुमत मिळवत विरोधकांचा सुफडा साफ केला आहे. जनतेने शिवसेना-भाजप महायुतीच्या बाजुने विश्वासाने कौल दिला असून जनतेच्या या विश्वासाला कदापीही तडा जावू देणार नाही, असेही स्पष्ट केले.

आपली बांधिलकी केवळ विकासाशीच असून यापुढे शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून शहराला विकासाचे ‘मॉडेल’ बनवण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम कटिबद्ध राहतील, अशी ग्वाही दिली. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी असल्याचे निकालाने स्पष्ट केले आहे. हा निकाल म्हणजे ही महानगरपालिकेच्या विजयाची नांदीच असल्याचा विश्वासही कदम यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments