HomeRatnagiriआंदोलन करणाऱ्या 800 शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कापले जाणार

आंदोलन करणाऱ्या 800 शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कापले जाणार

शिक्षक समन्वय समितीची ऑनलाईन बैठक घेण्यात आली.

शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या संचमान्यता निर्णयाविरोधात तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटनांनी शाळा बंद ठेवून सामूहिक रजा आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी ८०० शिक्षकांचे एक दिवसांचे वेतन कपात करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीने शुक्रवार दि. ५ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र पालिका निवडणूक आचारसंहितेमुळे हा मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत शिक्षक समन्वय समितीची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये आंदोलन स्थगित करण्यावरून जोरदार चर्चा झाली. या बैठकीत चार शिक्षक संघटनांनी आंदोलन स्थगितीला विरोध केला. या संघटनांनी शाळा बंद व सामूहिक रजा आंदोलन करण्यावर ठाम भूमिका घेतली. त्यावरून शिक्षक समन्वय समितीत फूट पडली. तरीही सुमारे ८०० शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments