HomeRatnagiriचणचणीमुळे कारभारी हैराण पगार, विकासकामे ठप्प

चणचणीमुळे कारभारी हैराण पगार, विकासकामे ठप्प

पालिकेच्या तिजोरीत अवघे १२ लाख रुपये शिल्लक आहेत.

सत्तेत आलेल्या शिवसेना-भाजपच्या नव्या कारभाऱ्यांनी पालिकेची आर्थिक स्थिती पाहून डोक्याला हात लावला आहे. पालिकेच्या तिजोरीत अवघे १२ लाख रुपये शिल्लक आहेत. कर्मचाऱ्यांचा पगार कसा करावा, अशी नाजूक स्थिती पालिकेची झालेली आहे. शासनाकडून निधी आणला तर जुने देणे देत भरायचे की, नवीन कामे करायची, असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडलेला आहे. प्रशासकीय कारभारात शहरातील प्रत्येक स्वच्छतागृहावर ५ लाख खर्च दाखवले आहेत. प्रत्यक्षात काहीच कामे झालेली नाहीत. वारेमाप पैसा खर्च करण्यात आल्याची माहिती नव्या लोकप्रतिनिधींनी सांगत पालिकेच्या कारभाराचे पितळ उघडे पाडले आहे. महायुतीच्या शिवसेना-भाजप पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पदभार घेऊन पंधरा दिवस झाले नाहीत, तोवर पालिकेच्या आर्थिक स्थितीची भयानक परिस्थिती समोर आली आहे. विकासकामे करण्याची उमेद बाळगणारे लोकप्रतिनिधी पालिकेची आर्थिक परिस्थिती पाहून चाट पडले आहेत. पालिकेचा कारभार हाकायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. पालिकेवर आता ४५ कोटींचा आर्थिक बोजा आहे.

त्यापैकी काही कोटी रक्कम निवडणुकीपूर्वी पालिकेला मिळाली होती; परंतु सत्ताधारी बसण्यापूर्वीच ते खर्च केल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये पालिकेवर प्रशासकीय कारभार होता. या काळात वारेमाप खर्च झाला आहे. मंजुरी न घेता अनेक कामे केली आहेत. ज्या कामाचा खर्च (उदाहरणार्थ) ५ लाख आहे त्यावर दहा ते पंधरा लाख खर्च झाला आहे. शहरातील ८० स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी ५ लाख रुपये खर्च दाखविला आहे. या स्वच्छतागृहांवर लाखभरदेखील खर्च झाला नसल्याचे लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या माहितीत पुढे आले आहे, असे प्रकार प्रत्येक विभागात घडत असल्यामुळे आढावा कुठून सुरू करायचा हाच सर्वांपुढे प्रश्न आहे.

कर्मचाऱ्यांत शिस्तीचा अभाव – गेली चार वर्षे पालिकेवर प्रशासकीय कारभार सुरू आहे आणि शिस्त नसलेला कारभार. त्यात गेल्या चार वर्षांमध्ये कर्मचारी, अधिकाऱ्यांना विचारणारे कोणी नसल्याने कधीही या कधीही जा, असा बेशिस्त कारभार सुरू आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments