साखरपा परिसरातील दोघांची ऑनलाईन फसवणूक

शाखेच्या खात्यावरून २२ हजार ५०० रुपये गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Must read

साखरपा परिसरात ऑनलाईन फसवणुकीच्या दोन घटना उघड झाल्या आहेत. मोबाईलला आलेली लिंक उघडल्यामुळे बँकेच्या खात्यातून पैसे गेल्याचे उघड झाले आहे. याबाबत दोन्ही तक्रारदारांनी बँकेत तक्रार दिली; मात्र कार्यवाही करण्यास बँकेने असमर्थता दर्शविली आहे. संजय ऊर्फ बाळू शिंदे (रा. भडकंबा पेठवाडी) यांना गेल्या आठवड्यात मोबाईलवर व्हॉट्स अॅपला एक मेसेज आला. त्यांना आलेल्या एका लिंकवर त्यांनी क्लिक केल्यावर त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या साखरपा शाखेच्या खात्यावरून २२ हजार ५०० रुपये गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे साखरपा येथील ऋषी पावसकर यांनाही असाच अनुभव आला. त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देवरूख शाखेतून पैसे गेल्याचे लक्षात आले. त्यांच्या खात्यातून २० हजार गेल्याचे त्यांनी सांगितले.

पावसकर आणि शिंदे यांनी दोघांनीही आपापल्या बँकेत या संदर्भात तक्रार केली असता बँकेने पैसे परत मिळविण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे. कोणत्याही प्रकारे पुरावा नसल्यामुळे या प्रकारचा शोध कसा घ्यायचा, असा प्रश्न बँकेपुढे आहे. याबाबत संजय शिंदे यांनी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली आहे. तसेच पावसकर यांनीही बँकेकडे तक्रार केली आहे. अनोळखी नंबरवरून आलेली कोणतीही बँकेची लिंक ओपन करू नये, असे आवाहन दोघांनीही केले आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article