HomeDapoliपिसाळलेल्या बैलाच्या हल्ल्यात हर्णैमध्ये सात ग्रामस्थ जखमी

पिसाळलेल्या बैलाच्या हल्ल्यात हर्णैमध्ये सात ग्रामस्थ जखमी

वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

दापोली शहरासह हर्णे बाजारपेठेत मोकाट गुरांची समस्या गंभीर झाली आहे. हर्णे येथे पिसाळलेल्या बैलाने केलेल्या हल्ल्यात ७ ग्रामस्थ जखमी झाले. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. दापोली शहरातही मुख्य बाजारपेठ, आझाद मैदान परिसर, बसस्थानक तसेच वर्दळीच्या रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे व्यापारी, ग्राहक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. हर्णेत सायंकाळी पाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले. काही दिवसांपूर्वी कुत्र्याने एका बैलाच्या डाव्या मांडीवर व तोंडावर चावे घेतले होते. त्यामुळे पिसाळलेल्या बैलाने हर्णेमधील ६ ते ७ ग्रामस्थांवर हल्ला केला. हा बैल बंदरात जोरात धावत जाऊन नागरिकांना मारण्याचा प्रयत्न करत होता. यात सातजण जखमी झाले असून, जितेंद्र तबिब, मारत आहेत. काही ठिकाणी ही गुरे दुकानांमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. काचांची तावदाने फुटणे, साहित्याची नासधूस करणे असे प्रकार घडत आहेत. शहरातील बाजारपेठेत भाजीपाला, फळे व इतर वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

व्यापाऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. वाहतुकीच्यादृष्टीनेही ही समस्या गंभीर ठरत आहे. रस्त्याच्या मधोमध बसणाऱ्या किंवा अचानक धावणाऱ्या गुरांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे अपघातांचा धोका वाढला असून, वाहतूक कोंडीही नित्याची झाली आहे. पादचाऱ्यांसाठी तर ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. अनेकदा गुरे आपापसात भिडत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments