24 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeEntertainmentसलमानकडून फ्रंट वर्कर्ससाठी मदतीचा हाथ

सलमानकडून फ्रंट वर्कर्ससाठी मदतीचा हाथ

राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता, अभिनेता सलमान खान पोलीस आणि फ्रंट वर्कर्सच्या मदतील धावला आहे. आजपर्यंत सलमान आणि त्याच्या स्वयंसेवी संस्था बीइंग ह्युमन या संस्थेबद्दल सर्वाना माहिती आहेच. सलमानने या संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजवंतांना बर्याच वेळा मदत करून आधार दिला आहे. या संस्थेमार्फत कायम काही ना काही मदत कार्य हे सुरूच असते. देश किंव्हा राज्य अगदी कोणत्या संकटकाळात असेल तर, सलमान कायमच स्वेच्छेने समाजसेवेमध्ये हिरीरीने सहभाग घेऊन सहकार्य करतो. सलमानच्या बिइंग ह्युमन नावाच्या त्याच्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यानं अनेक भुकेलेल्यांची पोट तृप्त केली आहेत. तसेच त्यांना आवश्यक असणारी मदत करून त्यांची संकटमुक्त केले आहे. यंदाच्या वर्षी सुद्धा हाच सलमान खान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कायम कार्यात मग्न असणार्या आपल्या पोलीस बांधवाना आणि फ्रंटलाईन वर्कर्सच्या मदतीला धावून गेला असून, लॉकडाऊन काळातही आपली भूक विसरून अहोरात्र कार्यरत असणाऱ्या कोविड योद्ध्यांसाठी सलमानने पुन्हा एकदा मदतीसाठी प्रयत्न केला आहे.

गेल्या चार दिवसांपासून संध्याकाळी 5 वाजल्या पासून ते रात्री 10 वाजेपर्यंत मुंबईच्या  जवळपास 100 ठिकाणांवर पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कर्सना आवश्यक सुविधा पुरवत आहे. Being Haangryy नावाने सलमानच्या स्वयंसेवी संस्थेचा एक फूड ट्रक कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सना चहा, पिण्याचं पाणी, खाण्याचे पदार्थ पुरवण्याची सेवा करत आहे. सध्याच्या घडीला मुंबईत वांद्रे ते जुहू आणि वांद्रे ते वरळी या भागात ही सेवा दिली जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांनी सलमान खान आणि राहुल कनाल यांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या या सेवेबद्दल ही सेवा नक्कीच स्वागतार्ह आहे, असे म्हणत आनंद व्यक्त केला.

salman helps covid front workers

तसेच मागील वर्षी देखील अन्नपुरवठा करणाऱ्या Being Haangryy या फूड ट्रकच्या माध्यमातून जवळपास 2 लाख नागरिकांना जीवनावश्यक अन्न पदार्थ तेल, तांदुळ, डाळी, पीठ अशा सामग्रीचा 4 महिन्यांपर्यंत पुरवठा केला होता. मुंबईत सध्याच्या घडीला कोरोनाची परिस्थिती जोपर्यंत आटोक्यात येत नाही तोपर्यंत लॉकडाऊन सुरू असेल आणि तोपर्यंत पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कर्सना साधा जेवणासाठी सुद्धा वेळ मिळत नाही, परंतु, या सर्व गंभीर परिस्थितीचा आढावा घेऊनच Being Haangryy संस्थेची ही फूड सेवा त्यांच्यासाठी अविरतपणे पुरवली जाईल असं संस्थेतर्फे सपष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -

Most Popular