HomeIndia Newsसंकटकाळात पाकिस्तानही पुढे सरसावले

संकटकाळात पाकिस्तानही पुढे सरसावले

भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढतचं जात आहे. सध्या देशातील कोरोना बाधितांची संख्या एक कोटी ६२ लाख ६३ हजारांवर पोहचली आहे. भारतामधील कोरोना परिस्थिती इतकी चिंताजनक बनत चालली आहे की आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आला आहे. या परिस्थितीत भारतातील गंभीर परिस्थिती पाहून पाकिस्तानने देखील भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. एधी फाउंडेशन ही एक पाकिस्तान स्थित सेवाभावी संस्था असून तीने या संकटकाळात मुक्तीसाठी भारताला ५० रुग्णवाहिका देण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि यासंदर्भात पंतप्रधान मोदीं यांनाही पत्रव्यवहार केले  आहेत.

सध्या एधीने घेतलेल्या या पुढाकारासाठी पाकिस्तानमध्ये संस्थेचे कौतुक होत आहे. एधी फाउंडेशनचे कार्यकारी व्यवस्थापक आणि ट्रस्टी असणाऱ्या फैजल एधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या संदर्भात एक पत्र लिहिले आहे. हे पत्र सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. भारतातील कोरोनाच्या भयानक परिस्थितीवर आम्ही लक्ष देऊन आहोत. कोरोना स्थिती आणि त्याचा भारतींयांवर होणारा दुष्परिणाम याकडे आमचे लक्ष आहे. या कोरोना महामारीचा भारतावर झालेल्या गंभीर परिणामा संदर्भात आम्हाला काळजी आहे. भारतामध्ये सध्या अनेकांना कोरोना संदर्भातील वैद्यकीय समस्यांना  सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या या संकटकाळामध्ये शेजारी राष्ट्र आणि एक मित्र म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्याकडून भारतामध्ये ५० रुग्णावाहिकांची मदत पाठवू इच्छितो. तसेच रुग्णवाहिकांसोबत त्यासंदर्भातील सेवा आम्ही तुम्हाला पुरवू इच्छितो, असे या पत्रामध्ये म्हटले आहे.

edhi foundation

माझे नाव फैजल एधी असून, एधी फाऊण्डेशनचा कार्यकारी ट्रस्टी आहे, मी स्वत: माझ्या संस्थेतील एक टीम भारतामध्ये कोरोन काळात मदतीसाठी पाठवू इच्छितो आहे. सध्याची कोरोना परिस्थिती खूपच गंभीर आहे, याची आम्हाला जाणीव आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला या संकटाच्या स्थितीत पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहोत. यामध्ये तुमच्या नियोजनात आमची काहीही अडचण होणार नाही, याची आम्ही योग्य तऱ्हेने काळजी घेऊ. त्यामुळे आमच्याकडून पाठवण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकां सोबत आम्ही आमची स्वयंसेवकांची टीमही पाठवू, असेही या पत्रात म्हटले आहे.

पाकिस्तानमधून येणारी ही टीम स्वत: सोबत सर्व गरजेचे सामान देखील घेऊन येणार आहे, फक्त गरज आहे ती भारताकडून परवानगी मिळण्याची. आम्हाला ही योजना राबवताना भारताकडून काहीही नको आहे. शेजारील राष्ट्र म्हणून फक्त आम्ही या समस्येच्या काळात मदतीचा हाथ पुढे करत आहोत. आम्ही आमच्या तीम्च्ला आवश्यक असणार आमचे जेवण, इंधन आणि इतर गोष्टी टीमसोबत पाठवयाला तयार आहोत. आमच्या टीममध्ये आरोग्य सेवेतील अधिकारी, इतर अधिकारी, चालक आणि सपोर्टींग स्टाफचा समावेश केलेला आहे असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

तुम्ही केवळ आम्हाला भारतात येण्याची परवानगी द्यावि. तुम्ही सांगाल त्या प्रदेशांमध्ये / विभागामध्ये आमच्या टीम कार्यावर पाठवण्यास तयार आहोत. आमचे काम हे सर्व तेथील नियमांप्रमाणेच आणि तुमच्या सांगण्याप्रमाणेच असेल, आम्हाला केवळ भारतात येण्याची परवानगी द्यावी. आमची सध्या सुरु असलेल्या महामारीच्या संकटाच्या प्रसंगामध्ये तुम्हाला मदत करण्याची इच्छा आहे. आम्हाला जशा पद्धतीने शक्य असेल तशा माध्यामातून आम्ही तुम्हाला मदत करु इच्छितो. पत्राच्या शेवटी एधी यांनी, आमच्या मदतीमुळे भारतीय नागरिकांना दिलासा मिळणार असेल तर तुम्ही म्हणाल ती आणि तेंव्हा मदत करायला आम्ही तयार आहोत, असे लिहिले आहे.

- Advertisment -

Most Popular