महाराष्ट्रातील कोरोना विषाणू संसर्गाबाबतीत जाणवणारा ओक्सिजनचा तुटवद्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळेत पुरवठा होण्यासाठी ऑक्सिजन एअर लिफ्ट करावा लागेल असं म्हटलं होतं आणि तशी मागणी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली होती. भारतीय हवाई दलाची मदत ऑक्सिजन एअरलिफ्ट करण्यासाठी भविष्यात घ्यावी लागणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र, सध्या उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या कल्पनेचे सत्यात रूप तेलंगणामध्ये उतरत आहे. तेलंगणा सरकारने ऑक्सिजन वेळेवर मिळण्यासाठी त्यावर मार्ग शोधून काढला आहे.
भारतीय हवाई दलाच्या सहाय्याने ऑक्सिजन टँकर एअरलिफ्ट करून आवश्यकतेनुसार योग्य त्या ठिकाणी पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तेलंगाणा सरकारानं ऑक्सिजन तुडवड्यावर यशस्वी तोडगा काढण्यासाठी हवाई दलाची युद्धामध्ये वापरली जाणारी विमानाच वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथून ऑक्सिजन पुरवठा केला जाणार असून रिकामे ऑक्सिजन टँकर घेऊन पहिलं विमान तेलंगाणातील बेगमपेट विमानतळा वरून भुवनेश्वरसाठी रवाना केल गेले आहे. या विमानांच्या सहाय्याने 14.5 मेट्रिक टन ऑक्सिजन एअरलिफ्ट करण्यात येणार आहे. यासाठी किमान आठ टँकचा वापर करण्यात येणार आहे.
तेलंगणा सरकार मधील नगरविकास मंत्री केटीआर यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. तसेच त्यांनी आरोग्यमंत्री इटाला राजेंद्रकुमार आणि तेलंगाणाचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांचे विशेष आभार मानले आहेत. हैदराबाद आणि भुवनेश्वर ऑक्सिजन टँकर एअरलिफ्ट केल्यानं वेळेची बचत होणार असून तीन दिवस वाचतील आणि त्यामुळे ऑक्सिजनचा वेळेमध्ये पुरवठा होऊन नागरिकांचे जीव वाचण्यास मदत होईल, असं केटीआर पुढे म्हणाले.
विशाखापट्टणम येथून महाराष्ट्राकडे ऑक्सिजन ट्रेन रात्री नागपूरमधून जाऊन असून उद्या सकाळी नाशिकला पोहोचेल. नाशिक मधून राज्यातील विविध भागानाजिथे मागणी आणि आवश्यकता आहे तिथे ऑक्सिजन पोहोचवला जाणार आहे. सिंगापूरच्या चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाचे C-17 विमान क्रायोजेनिक ऑक्सिजन टॅन्कचे चार कन्टेनर पोहोचले आहेत. हे विमान या ठिकाणी ऑक्सिजन भरून संध्याकाळ पर्यंत पश्चिम बंगालच्या पनागर एअरबेसवर उतरणार आहे. कालपासून देशातील कोरोनाची भयावह स्थिती लक्षात घेऊन हवाई दलाने ऑक्सिजनचे टॅन्कर आणि रिकामे कन्टेनर देशभरातील विवध ठिकाणच्या फिलिंग स्टेशनवर पोहोचवण्याचं काम एअर लिफ्टिंगच्या माध्यमातून करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या कामाची गती वाढली आहे. तसेच हवाई दलाच्या विमानांनी मुंबई, कोच्ची, विशाखापट्टनम आणि बंगळुरु या ठिकाणच्या डॉक्टर्स, नर्सेसना दिल्लीमध्ये पोहोचवण्याचे काम वेगाने सुरू केलं आहे. भारतामध्ये ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट भिलाई, विशाखापट्टण, बेल्लारी, अंगुल, पेरामंबुदूर या ठिकाणी असून तेथे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन प्लांट निर्मिती केली जाते. देशातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यातच अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतीय हवाई दलाने पुढे येऊन देशातील रुग्णालयांना ऑक्सिजनची पुरवठा सुरळीत करण्यासाठी कंबर कसली आहे.