कोरोनाच्या या संकट काळामध्ये अनेकांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही जणाकडे २ वेळच्या जेवणाची सुद्धा सोय होणे कठीण बनले आहे. काही जणांनी या कोरोना महामारीमध्ये जे इतक्या वर्षात कमावलेले ते आजारपणात किंवा घर सांभाळण्यात खर्च झाले असून आता वेळ अजून खराब आली आहे. अशा नैराश्यमय वातावरणामध्ये काही सकारात्मक ऐकायला मिळाले तर आयुष्यात काही करण्याची ऊर्मी जागृत होते.
सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या काळात अनेक जण बेरोजगार झाले आहेत. काही वर्क फ्रॉम होम करत आहेत. पण काही जणांना प्रवासी वाहतूक बंद केल्याने आपली नोकरी गमवावी लागली आहे आणि या दरम्यान अनेकांना परत नोकरी मिळवणे सुद्धा अशक्यप्राय बनले आहे. अनेक कंपन्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराम्ध्ये कपात केली जात आहे. पण नोकरी टिकून राहावी म्हणून कर्मचारी सुद्धा आहे ती परिस्थितीमध्ये काम करत आहेत. अशा कोरोना काळात भारतीयांसाठी एक आल्हाद्दायक बातमी समोर आली आहे. भारतीयांना टेक सेक्टर मध्ये नोकरी मिळवण्याची एक जबरदस्त संधी चालून आली आहे. या वर्षी अमेरिकेची बँकिंग कंपनी जेपी मॉर्गनने भारतामध्ये हजारो लोकांना नोकरी देण्याचा मानस केला आहे.
जेपी मॉर्गनने यावर स्पष्ट केले आहे कि, भारतात यावर्षी जवळजवळ ४ हजार अनुभवी टेक्नोलॉजिस्ट आपल्या कंपनीसोबत जोडायचे आहे. जेपी मॉर्गन कंपनीमधील एच.आर इंडिया कॉर्पोरेट सेंटरचे प्रमुख गौरव अहलूवालिया यांनी सांगितले की, तंत्रज्ञान आमच्या ग्राहकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचायला आणि बिजनेस स्ट्रेटजीसाठी अत्यंत महत्वाची बाब आहे. आम्ही नेहमीच यांच्यातील ज्ञानाला विकसित करण्यास तयार आहोत. ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस, क्लाउड डेटा, मशीन लर्निंग, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सायबर स्पेस सारख्या अत्यंत महत्वाच्या विभागांचा समावेश केला गेला आहे.
सध्याच्या घडीला जेपी मॉर्गन कंपनीमध्ये २.५ लाखांहून जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये एकट्या भारतामध्ये ३५ हजार एवढ्या संखेने कर्मचारी कार्यरत आहेत. हे सर्व कर्मचारी मुंबई, बेंगलोर आणि हैदराबादमध्ये सुरू झालेल्या टेक्नोलॉजी अँड ऑपरेशन्स सेंटरमध्ये कार्यरत आहेत. ही सर्व सेंटरस ग्लोबल इंवेस्टमेंट बँकेच्या ऑपरेशन सिस्टीमला सपोर्ट करतात.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, होणारी भरती ही जास्तीत जास्त बेंगलोर मधील टेक सेंटरकरिता केली जाणार आहे. यासंबंधीची जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमोन यांनी सांगितले की, जेपी मॉर्गन चेस ने भारतातील कोविडविषाणूच्या लढाई विरोधात लढण्यासाठी २० लाख अमेरिकी डॉलरची मदत जाहीर केली असून, आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनासुद्धा वैयक्तिकरित्या मदतीचे आवाहन केले आहे. त्यामुळे जे कोणी उच्चशिक्षित असून सुद्धा सद्य परिस्थितीमुळे बेरोजगार झाले असतील त्यांनी अशा संधीचा फायदा करून घेण्याचे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.