30 C
Mumbai
Thursday, May 16, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeSports Newsहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी

हार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी

हार्दिक पंड्या याची ओळख एक उत्कृष्ट आणि ऑलराउंडर खेळाडूमध्ये केली जाते. परंतु, गेल्या  काही महिन्याम्ध्ये त्याच्या पाठीच्या दुखण्यामुळे त्याने गोलंदाजी करण्याचे बंद केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हार्दिकची वर्णी आता उत्कृष्ट खेळाडू म्हणून न राहता फक्त तो एक फलंदाज उरला आहे, असा क्रीकेट प्रेमीमध्ये चर्चेचा विषय बनत आहे. आणि याच गोष्टची जाण कुठेतरी भारतीय संघालाही झाली आहे. त्यामुळे इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात हार्दिकच्या जागी संघात एक चांगला अष्टपैलू खेळाडू सापडल्याचे वक्तव्य प्रशिक्षकांनी केले आहे.

भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी, हार्दिक पंड्या सध्याच्या घडीला पाठीच्या दुखण्यामुळे गोलंदाजी करताना दिसून येत नसल्याचे सांगितले. पण भारतीय टीममधील शार्दुल ठाकूर हा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत शार्दुलने बर्याच झालेल्या सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी करून, वेळ पडल्यावर उपयुक्त फलंदाजीही केली आहे आहे, त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर हर्दीक्च्या ऐवजी शार्दुलची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शार्दुल हा एक चांगला अष्टपैलू खेळाडू असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशिक्षक अरुण यांनी पुढे सांगितले कि, निवड समितीचे कार्य हे भारतीय संघासाठी उत्तमोत्तम खेळाडू निवडून देणे हे आहे. त्यानंतर संघात सामील झाल्यावर खेळाडूवर आम्ही योग्यप्रकारे संस्कार घडवत असतो. शार्दुलने ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा दमदार कामगिरी करून ही गोष्ट वारंवार सिद्ध केली आहे कि, तो एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे आता त्याच्या निवडीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

hardik pandya replacement

अरुण यांनी यावेळी हार्दिकबाबत सांगितले की, हार्दिक अखेर २०१८ साली झालेल्या इंग्लंडच्या दौऱ्यादरम्यान खेळला होता. पण त्यानंतरच्या झालेल्या २०१९ सालच्या आयपीएलमध्ये त्याच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला गोलंदाजी करता येण शक्य होत नव्हत. त्या स्पर्धेनंतर हार्दिकच्या पाठीवर शस्त्रक्रीयाही करण्यात आली, या कारणाने तो बराच कालावधीपर्यंत गोलंदाजी करु शकलेला नाही. हार्दिक हा एक प्रतिभावान खेळाडू आहेच, पण पाठीच्या शस्त्रक्रीयेनंतर त्याचे संघात लगेचच पुनरागमन होणे सोपे असणार नाही.

हार्दिक पांड्या पाठीच्या दुखण्यामुळे गोलंदाजी करण्यास समर्थ नव्हता, तेंव्हा शार्दुल भारतीय संघाच्या मदतीला धावून आल्याचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी सांगितले. सध्या हार्दिकची स्थिती  गोलंदाजी करण्याची नसल्याने फक्त फलंदाजीसाठी त्याचा विचार बीसीसीआय करणार नाही, त्यामुळे  इंग्लंड दौऱ्यासाठी त्याचा विचार करण्यात आलेला नाही. त्याच्या ऐवजी शार्दुल ठाकूर या वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलु खेळाडूला संधी देण्यास बीसीसीआय विचार करत आहे. अशा परिस्थितीमध्ये ठाकूरने स्वत:ची उपयुक्तता आधीच्या सामन्यांमध्ये सिद्ध केलेली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या दोन कसोटी सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या शार्दुलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये ब्रिस्बेन कसोटी अर्धशतक केले होते, या व्यतिरिक्त प्रतिस्पर्धी सात गडीही बाद केले होते. शार्दुलला इंग्लंड दौऱ्यात मिळालेल्या संधीचे तो नक्कीच सोने करेल आणि आपले अष्टपैलूत्व सिद्ध करेल, अशी अपेक्षा ठेवत आहे.

- Advertisment -

Most Popular