भारतीय संघातील माजी खेळाडू रमेश पोवार यांची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी वर्णी लागली आहे. बीसीसीआयने यासंदर्भातील माहिती ट्विट करून सांगितली आहे. रमेश पोवारांनी अनेक अनुभवीना मागे टाकत बाजी मारली आहे. डब्ल्यूव्ही रमन यांची जागा रिक्त झाली होती, ती आता रमेश पोवारनी घेतली आहे. बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी १३ एप्रिलला जाहिरात प्रसिद्ध केलेली. त्यासाठी अनेक दिग्गज आणि अनुभवी क्रिकेटपटूंनी अर्ज केले होते. मात्र सर्व प्रक्रियेनंतर पोवार त्यांच्यामध्ये अव्वल ठरले.
महिल्या संघाच्या प्रशिक्षकपदा करिता एकूण ३५ अर्ज आले होते. त्यातून ८ जणांना शोर्ट लिस्टेड करण्यात आले होते. यामध्ये ऋषिकेश कानिटकर, अजय रात्रा, सुमन शर्मा, डबल्यू व्ही रमन, रमेश पवार, ममाथा माबेन, हेमलता काला आणि देविका वैद्य यांच्या अर्जाचा समावेश होता. बीसीसीआयच्या सल्लागार समितीने या ८ जणांची मुलाखत घेतली. या समितीमध्ये आरपी सिंग, मदन लाल आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश होता. मात्र या ८ जणांपेक्षा पोवार वरचढ ठरले. अखेर बीसीसीआयच्या सल्लागार समितीने पोवार यांची महिला संघ प्रशिक्षक पदासाठी अंतिम रमेश पोवार यांचे नाव घोषित केलं.
रमेश पोवार यांची प्रशिक्षक म्हणून काम करण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यांनी याआधीही २०१८ साली जुलै-नोव्हेंबर कालावधीमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचं प्रशिक्षकपद सांभाळल आहे. महिला संघाने पोवारांच्या मार्गदर्शनाखाली २०१८ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलपर्यंत मजल मारली होती. पृथ्वी शॉने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला विजय हजारे करंडक मिळवून दिला होता. यावेळेस पोवार यांनी मुंबई संघाच्या प्रशिक्षक पदाचे काम पहिले होते.
रमेश पोवारांची क्रीकेट कारकीर्द पाहता त्यांनी ३१ वनडे आणि २ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलं होते. यामध्ये त्यांनी कसोटीमध्ये ६ तर वनडेत ३४ विकेट्स मिळवल्या आहेत. यासह त्यांनी फर्स्ट क्लास १४८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी कसोटीमध्ये ४७० विकेट्स आणि त्या सोबत ४ हजार २४५ धावाही केल्या आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी प्रशिक्षणाकडे दौरा वळवला.
पूर्वी भारतीय महिला संघाचे प्रमुख प्रशिक्षक पदी तुषार आरोटे काम पाहत होते, २०१८ साली त्यांच्या राजीनाम्यानंतर त्या जागी भारताचे माजी क्रीकेटपटू रमेश पोवार यांची नियुक्ती करण्यात आली. नोव्हेंबरमध्ये झालेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपपर्यंत रमेश पोवारांकडे ही जबाबदारी देण्यात आली होती. आणि ती त्यांनी उत्कृष्टपणे निभावली.