मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याबद्दल समाज माध्यमांमधून आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित केल्याबद्दल शहरातील वरवीपेठ येथील अमृत तांबडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपा शिष्टमंडळाने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनामार्फत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह, अपमानास्पद आणि बदनामीकारक मजकूर अमृत अनंत तांबडे यांनी प्रकाशित केला आहे. हा मजकूर पूर्णपणे चुकीचा असून, त्याचा उद्देश समाजात तेढ निर्माण करणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करणे हा आहे. राज्याच्या मुख्यमंत्री या संविधानिक पदावर बसणाऱ्या व्यक्तीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे समस्त मराठी माणसांच्या भावना दुखावल्या आहेत.
या प्रकरणाची ताम्काळ दखल घेऊन, संबंधित मजकूर त्वरित काढून टाकावा आणि दोषी व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, अशी मागणी निवेदनामार्फत केली आहे. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत गुरव, जिल्हा सहचिटणीस स्वींद्र नागरेकर, यो. शीतल पटेल, अनिलकुमार करगुंटकर, सी. शीतत रहारे, संदेश विचारे, विवेक गुरव, संदीप तेरवणकर, मारूती कांबळे, प्ररात्र देवस्थळी यांच्यासहीत भाजपाने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
