33 C
Mumbai
Friday, October 11, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeMaharashtra Newsमुंबईत गणेश विसर्जनाची महातयारी, मंगळवारी कोणते मार्ग बंद राहणार?

मुंबईत गणेश विसर्जनाची महातयारी, मंगळवारी कोणते मार्ग बंद राहणार?

मुंबई: गणपती विसर्जनादरम्यान भाविकांना बाप्पाचं शेवटचं (Mumbai Ganesh Visarjan) दर्शन घेता यावं आणि मिरवणुकीत सहभागी होता यावं यासाठी मुंबई पोलीस तयारीत आहेत. मुंबईत 204 कृत्रिम तलावांसह भाविक BMC ने दिलेलं QR कोड स्कॅन करून आपल्या जवळील विसर्जन स्थळाची माहिती मिळवू शकतात. याशिवाय बीएमसीने शहरभरात 12,000 हून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत. याशिवाय सुरक्षेसाठी 10 हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या मदतीने प्रत्येक घडामोडीवर नजर असेल. 

बीएमसीने मुंबईत 204 कृत्रिम तलाव आणि 69 नैसर्गिक  स्थळांवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी बीएमसीने 204 कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. 

गणपती विसर्जनादरम्यान वाहतुकीच्या मार्गात बदल…

  1. मरीन ड्राइव्ह – NS रोडच्या उत्तरेचा ट्रॅफिक आवश्यकता भासल्यास इस्लाम जिमखानाहून मुंबई कोस्टल रोडकडे वळविण्यात येईल. 
  2. महापालिका मार्ग – CSMT जंक्शन ते मेट्रो जंक्शनपर्यंत रस्ता गरज भासल्यास बंद ठेवण्यात येऊ शकतो. येथील वाहतूक CSMT जंक्शनहून डीएन रोडवर वळविण्यात येईल. 
  3. JSS रोड – अल्फ्रेड जंक्शन ते पोर्तुगीज चर्चपर्यंतचा रस्ता बंद ठेवण्यात येऊ शकतो. येथील वाहतूक काळबादेवीहून वळविण्यात येईल. 
  4. जुहू तारा रोड – सांताक्रूज पोलीस स्टेशन जंक्शन ते वी हॉटेल जंक्शनपर्यंतचा रस्ता बंद राहील. 
  5. गोखले ब्रिज रोड – जड वाहनांना बंदी राहील. 
  6. मार्वे रोड जंक्शन, मालाड – मार्वे रोड ते मिथ चौकीपर्यंतचा रस्ता बंद राहील.

गणपती विसर्जनासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे. गणेश उत्सवादरम्यान उत्तर मुंबईहून दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणारा कोस्टल रोड 18 सप्टेबरपर्यंत सुरू राहील. विसर्जनादरम्यान इस्टन फ्री वे/ अटल सेतू, काळबादेवी रोड, महात्मा फुले रोड, कफ परेड आणि बधवार पार्कमध्ये वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणपती विसर्जनादरम्यान नागरिकांनी या भागातून प्रवास करणे टाळावं अशी नियमावली जारी करण्यात आली आहे. याशिवाय इस्टर्न मार्गावर साकीनाका, मुलुंड, मानखुर्द आणि ट्रॉम्बे या भागात विसर्जनादरम्यान गर्दीची शक्यता आहे. चेंबूर, चुनाभट्टी आणि एमआयडीसी भागात मोठी गर्दी होऊ शकते. याशिवाय पश्चिम भागात सांताक्रूझ वाकोला ब्रिज, जुहू बीच, डीएन नगर, सहारा, कांदिवली गोरेगाव आणि बोरीवली भागात विसर्जनादरम्यान मोठी गर्दी होऊ शकते. 

- Advertisment -

Most Popular