28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeSports NewsCricketक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत

क्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत

भारतातील कोरोना रुग्णांसाठी भारतीय संघातील क्रिकेटपटू हनुमा विहारी सर्वतोपरी मदत करताना पुढे आल्याचे दिसत आहे. विहारीने इंटरनेटच्या माध्यमातून एक ग्रुप बनवला असून, यामध्ये कोरोना रुग्णांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीचे काम सुरु आहे, जसे कि, हॉस्पिटलमध्ये बेड्सची उपलब्धता करून देणे, त्याचबरोबर ज्यांना ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकता भासत आहे त्यांना वेळेवर ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देणे. सध्याच्या घडीला हनुमा विहारी हा भारतात नसून इंग्लंडमध्ये असला तरी भारतातील कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी तो कुठेही कमी पडताना दिसत नाही आहे.

सध्याच्या घडीला विहारीने १०० व्हेंटिलेटर्सची एक टीम बनवली असून, आपल्या मित्रांच्या सहाय्याने ज्यांना ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता भासेल, त्यांना त्या सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्याकडे विहारी लक्ष केंद्रित करून आहे. फक्त वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यावरच हनुमा थांबला नसून, तो कोरोना रुग्णांसाठी मोफत भोजनाचीही व्यवस्था पुरवली आहे. त्याच बरोबर कोणाला प्लाझ्माची गरज असेल तर ते देखील विहारी मित्रांच्या सहाय्याने उपलब्ध करून देताना बघायला मिळत आहे. त्यामुळे सध्याच्या या परिस्थितीमध्ये विहारी भारतातील कोरोना रुग्णांसाठी एक देवमाणूस ठरत असल्याचे ऐकायला मिळत आहे.

hanuma vihari help out corona suffered people

एका मुलाखतीमध्ये विहारीने एका अनुभवाबद्दल सांगितले आहे कि, मी स्वत:चच कौतुक करत नाही आहे, परंतु, खरच त्या गरजू लोकांना माझ्याकडून फुल ना फुलाची पाकळी प्रमाणे थोडीतरी मदत मिळावी, हेचं माझे एकमेव ध्येय आहे आणि त्यासाठी मी मला शक्य असेपर्यंत सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. सध्या भारतामध्ये कोरोन महामारीमुळे कठीण काळ सुरु आहे आणि त्यावेळी आपण सर्वांनी एकत्रित येऊन एकमेकांना मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे, असे मला वाटते. कोरोनाची दुसरी लाट ही मागच्या वर्षीपेक्षा जास्तच घातक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड्स मिळणे कठीण बनले आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून मी माझ्या चाहत्यांच्या आणि मित्रांच्या सहाय्याने गरजू लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतावर सध्या कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा वाइट परिणाम झालेला दिसत आहे. जगासह देशातील अनेक लोक या साथीच्या रोगाला बळी पडली आहेत. या व्यतिरिक्त हजारो लोक आपले तसेच कुटुंबतील सदस्यांचे जीव वाचवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. प्रत्येक भारतीय आपापल्या परिने प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसत आहे. तसेच भारतीय संघातील काही खेळाडू विविध स्तरातून त्यांच्या पातळीवर लोकांना मदत पुरवत आहेत.

एक छोटासा अनुभव सुद्धा भारताचा स्टार खेळाडू हनुमा विहारीने शेअर केला आहे. अगदी मध्यरात्री सुद्धा मदतीसाठी कोणाचे फोन अथवा मेसेज येतील सांगता येत नाही. गरजेला वेळ काळ काहीही नसतो. एक व्यक्तीला मध्यरात्री सुद्धा मदत करून जीव वाचवन्यास हनुमाने मदत केली आहे. हनुमा सध्या सोशल मिडिया, ट्वीटरवर जास्त प्रमाणात अॅक्टिव आहे. आपल्या परिने जेंव्हा आणि जेवढी मदत करणे शक्य आहे, तेवढ्या लोकांना तो मदत करत आहे. मध्यरात्री एका व्यक्तीला हनुमाकडे मदत मागितली आहे. सोशल मीडियावर त्याच्या चाटचा स्क्रिनशॉट खूप व्हायरल झाला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये युझरने अण्णा धन्यवाद, तुम्ही आज जीव वाचवला आहे, असे लिहिले आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करताना त्या युझरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, धन्यवाद हनुमा गारु. गरजवंताला अगदी मध्यरात्रीही आपण मदत करत आहात. माझ्याकडून ज्यांना खऱ्या अर्थानं मदतीची गरज आहे अशांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचं हनुमाने स्पष्ट केलं आहे. जशी चांगली बाजू असते तशी वाईटही बाजू असते, या मदतीवरून काही युझर्सनी त्यांला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला, परंतु विहारीने त्यांना चोख प्रत्युत्तर देऊन त्यांची विकेट घेतली आणि बोलती बंद केली.

- Advertisment -

Most Popular