HomeRatnagiriमहावितरणमधील कंत्राटी कामगार कायम होणार

महावितरणमधील कंत्राटी कामगार कायम होणार

२२८५ कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा निर्णय दिला आहे.

महावितरणमधील वीज कंत्राटी कामगारांना कायम करावे या मागणीसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाने २०१२ साली मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हे प्रकरण कामगार न्यायालयाकडे आल्यानंतर कामगार आयुक्त ल.य. भुजबळ यांनी २२८५ कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने हे प्रकरण ठाणे येथील ओद्योगिक न्यायालय येथे वर्ग करण्यात आले. बुधवारी हा निकाल १० डिसेंबर रोजी यांनी अधिकृतरीत्या संघटनेला दिला. कामगार आयुक्त कार्यालयात संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, उपसरचिटणीस राहुल बोडके, संघटन, सचिव उमेश आणेराव व कोषाध्यक्ष सागर पवार उपस्थिन होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments