HomeRajapurधुतपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी पालकमंत्र्यांना साकडे

धुतपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी पालकमंत्र्यांना साकडे

श्रीदेव धूतपापेश्वर मंदिराकडे पर्यटक व भाविकांचा ओढा वाढला आहे.

कोकणातील एक प्रसिध्द देवस्थान व राजापुरातील असंख्य भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीदेव धूतपापेश्वर मंदिराचे आपल्या शासनाच्या माध्यमातून सुमारे ११ कोटी रूपये खर्च करून सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे श्रीदेव धूतपापेश्वर मंदिराकडे पर्यटक व भाविकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे पर्यटक व भाविकांच्या सोयीकरता देवस्थानाकडे जाणा-या रस्त्याचे रूंदीकरण तसेच काँक्रीटीकरण व सुशोभिकरण करण्याची आवश्यक्ता आहे तशी मागणी कोंडेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर योनी पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत व आ. किरण सामंत यांच्याकडे केली आहे. राजापूर शहरातून मंदिराकडे जाणा-या मार्गावरून चापडेवाडी ते श्रीधूतपापेश्वरं देवस्थानकडे जाताना गणपती मंदिरापर्यंत रस्त्याचे रूंदीकरण अत्यंत आवश्यक आहे. राजापूर शहरातून मंदिराकडे जाणा-या मार्गावरून चापडेवाडी ते श्रीधुतपापेश्वर देवस्थानकडे जाताना गणपती मंदिरापर्यंत रस्त्याचे रूंदीकरण अत्यंत आवश्यक आहे. भक्तगणांना तसेच पर्यटकांना व त्यांच्या वाहनांना ये-जा करण्यासाठी सद्यस्थितीत असलेला अरूंद रस्ता खूप त्रासदायक होत असून दोन वाहने समोरासमोरून आल्यानंतर कसरतीने चालवावी लागत आहेत.

तसेच महाशिवरात्री यात्रेवेळी संपूर्ण पंचक्रोशी तसेच राजापूर शहरासह जिल्हयातील भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यावेळी अरूंद रस्त्यामुळे भाविकांना निशाणघाटी तसेच प्राथमिक शाळेजवळ वाहने लावून सुमारे एक किलोमीटरची पायपीट करून मंदिराकडे जावे लागत असते. तसेच रिक्षाचालक, मोटारसायकल किंवा चारचाकी वाहने यांना अतिशय त्रासदायक होत आहे. अरूंद रस्त्यामुळे सहा चाकी वाहन एसटी किंवा आरामबस येत नसल्यामुळे पर्यटकांची सुध्दा गैरसोय होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून एक म हत्वाची बाब म्हणून तत्काळ या रस्त्याचे रूंदीकरण व काँक्रीटीकरण गरजेचे आहे. तसेच एका बाजूने सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंती व कठडे बांधणे गरजेचे आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने नवीन पध्दतीच्या स्ट्रीट लाईट व शोभेची झाडे लावून सौंदर्यात भर घातल्यास पर्यटनाला अधिक चालना मिळेल. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याच्या रूंदीकरणाचे व काँक्रीटीकरणाचे काम मार्गी लावावे अशी मागणी अरविंद लांजेकर यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.’

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments