हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जय महाराष्ट्र मित्र मंडळ गुरववाडी आणि मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरात तपासणी केलेल्यांपैकी २३ रुग्णांवर डेरवण येथील रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. बी. के. एल. वालावलकर रुग्णालय (डेरवण) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचे उद्घाटन माजी आमदार गणपत कदम यांच्या हस्ते फीत कापून केले. याप्रसंगी रवींद्र डोळस, कमलाकर कदम, संजय पवार, प्राची शिर्के, वीणा विचारे, श्रद्धा धालवलकर, नाना गोटम आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात हृदयरोग, मूत्रविकार, कॅन्सर, नेत्ररोग, स्त्रीरोग तसेच नाक-कान-घसा अशा विविध व्याधींची तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली. राजापूर शहर व ग्रामीण भागातील एकूण ११३ नागरिकांनी या संधीचा लाभ घेतला. यापैकी २३ रुग्णांना पुढील शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरवण्यात आले असून, त्यांच्यावर डेरवण येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून नवनिर्वाचित नगराध्यक्षा अॅड. सौ. हुस्नबानू खलिफे, तसेच नगरसेवक अफरोज झारी, नेहा तानवडे, सिद्धांत जाधव, जमीर खलिफे, अमीन गडकरी, शबाना मुल्ला आणि सुलतान ठाकूर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिबिर यशस्वी करण्यासाठी मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन शिंदे, जय महाराष्ट्रचे अध्यक्ष व नगरसेवक विनय गुरव, विजय गुरव, शशिधर गुरव, दत्ताराम गुरव, विलास गुरव, सुरेश गुरव, मंगेश गुरव, जितेंद्र गुरव, नवीन बागवे, विराज गुरव, मेघा गुरव, पराग गुरव, रोहन गुरव, रोहित गुरव, संकेत गुरव, सुहासिनी गुरव, तन्मय गुरव, आनंद गुरव आदींनी विशेष परिश्रम घेतले. वालावलकर हॉस्पिटलचे श्री. धुमाळ आणि त्यांच्या सर्व डॉक्टर्स व स्टाफचे या शिबिरासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
गरजू रुग्णांना दिलासा – राजापूर येथे झालेल्या मोफत तपासणी शिबिरात शस्त्रक्रियेसाठी २३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यांच्यावर २ फेब्रुवारीपर्यंत बी. के. एल. वालाव-लकर रुग्णालय, डेरवण येथे मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.
