भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना काल मनुका ओव्हल मैदानावर खेळवला गेला. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात झाली असून भारताने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात काही बदल करण्याची शक्यता आहे. काही खेळाडूंची अदलाबदल बदल करण्यात येईल असा अंदाज वर्तविला जात आहे.
फिरकीपटू युजवेंद्र चहल ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरल्याचं दिसले, त्याने पहिल्या सामन्यात १० षटकात ८९ धावा केल्या तर दुसऱ्या वनडे मध्ये ९ षटकात ७१ धावा केल्या होत्या. अशातच तिसऱ्या सामन्यात कर्णधार विराट कोहली त्याच्या ऐवजी गोलंदाज कुलदीप यादवला संधी मिळू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कुलदीपची कामगिरी चांगली आहे. जलदगती गोलंदाज नवदीप सैनीही ऑस्ट्रेलिया विरुद्ध आतापर्यंत कमाल दाखवू शकला नाही. पहिल्या सामन्यात १० षटकात ८३ धावा देणाऱ्या सैनीने दुस-या वनडेत सात षटकांमध्येच तब्बल ७० धावा केल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात कर्णधार विराट कोहली सैनीऐवजी कदाचित टी नटराजनला सुद्धा पदार्पणाची संधी देऊ शकतो. तसेच शार्दुल ठाकूरचीही सैनीच्या ऐवजी वर्णी लागू शकते. सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवाल दोन्ही सामन्यात वेगाने धावा काढण्याच्या प्रयत्नात आउट होऊन माघारी परतला होता. पहिल्या वनडेमध्ये २२ धावा करणा-या मयांकला दुसऱ्या सामन्यात २८ चं धावा करता आल्या. चांगल्या सुरुवातीनंतरही मयांकला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे त्याच्या जागी शुभमन गिललाही संधी मिळू शकते.
एकीकडे वनडे सामन्याची चर्चा सुरु असताना, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या वनडे सामन्यात विराट कोहली याने आपल्या नवे नवीन विक्रम रचला आहे. तिसऱ्या वनडेत २३ वी धाव घेताना विराटनं नवा इतिहास रचला. त्यानं एकदिवसीय क्रीकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेगानं १२ हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे. मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम त्याने मोडला आहे. विराट कोहलीनं केवळ २४२ इनिंगमध्ये १२ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. हा विक्रम आधी सचिनच्या नावे होता. सचिननं ३०० इनिंगमध्ये १२ हजार धावा केल्या होत्या.
Innings taken to reach 10,000 ODI runs:
— ICC (@ICC) October 24, 2020
Virat Kohli → 205
Sachin Tendulkar → 259 #OnThisDay in 2018, with his 157* against West Indies, Kohli broke Tendulkar's record to become the fastest player to reach the 10K milestone 💪 pic.twitter.com/r0ScMVIUiK
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३ धावांनी शानदार विजय नोंदवला. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ५ गडी गमावून ३०२ धावा करून भारतीय संघाने तिसर्या वनडेमध्ये दणदणीत विजय मिळविला.