31 C
Mumbai
Saturday, April 13, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeIndia Newsटांगेवाला कसा बनला मसाला किंग !

टांगेवाला कसा बनला मसाला किंग !

एमडीएचचे मालक आणि मसाला किंग महाशय धर्मपाल गुलाटी यांचं  आज निधन झालं. आज ३ डिसेंबर सकाळी ५ वाजून ३८ मिनिटांनी वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मसाला किंग म्हणून ज्यांची सर्वदूर ख्याती होती, ते एमडीएच मसाल्याचे सर्वेसर्वा धर्मपाल गुलाटी यांचे वयाच्या ९८ च्या वर्षी निधन. त्यांचा टांगेवाला – मसाल्याचे दुकानदार ते उद्योजक असा प्रवास अवर्णनीय होता. महाशयान दि हट्टी (MDH) हे नाव भारतापुरतेच मर्यादित राहिले नव्हते तर विदेशातही या ब्रॅंडचे नाव प्रसिद्ध आहे. ५ वी मध्ये असताना एकदा शिक्षक रागावले म्हणून त्यांनी थेट शाळा सोडण्याचा निर्णय घेतला आणि सरळ पतंग हातात घेतला, कबुतरं उडवायला सुरुवात केलीत्यांच्या कंपनीचं नाव  ‘एमडीएच’ हे नाव ‘महाशियान दि हट्टी’ यावरून आलं आहे. पंजाबी लोक दुकानाला हट्टी म्हणतात.

महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म २७ मार्च १९२३ रोजी पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झाला होता. १९४७ साली झालेल्या फाळणीमध्ये त्यांना भारतामध्ये स्थलांतरित व्हावे लागले. परंतु भारतात आल्यावर उद्योग धंदा व्यवसाय काहीच नसल्याने उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ लागला. हातामध्ये फक्त १५००  रुपये घेऊन ते भारतात आले. याच विचारात ते चांदनी चौकात गेला आणि तिथं ६५०  रुपयांना त्यांनी टांगा विकत घेतला. ‘करोलबाग दोन आना’, ‘करोलबाग दोन आना’ असं इतर टांगेवाल्यांसारखं ओरडूनही त्यांना गिऱ्हाईक मिळत नव्हते.  शेवटी त्यांनी टांगा देऊन टाकला आणि वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली कि सियालकोटचे मसाले मिळतील.  नंतर एका लाकडी दुकानात बसून ते मसाले विकू लागले. काही काळानंतर याच खारी बावली भागामध्ये त्यांनी दुकान सुरू केले. मग ते दिवसातले १२ ते १५  तास काम करू लागले. खारी बावलीमध्ये जम बसल्यावर दिल्लीच्या इतर भागांमध्येही त्यांनी आपली मसाल्यांची दुकाने सुरु केली. आज त्यांचा व्यवसाय १००० कोटींच्या वर गेला आहे. देशातल्या कंपन्यांच्या सीईओंमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांमध्ये त्यांची गणना केली जात होती.

dharmapal gulati MDH king passed away

इथेच त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या आयुष्यात खडतर परिश्रम घेऊन मसाल्याचा व्यवसाय उभा केला. त्यांच्या मेहनत आणि जिद्दीमुळेच त्यांना मसाला किंग हे नाव मिळाले. देशातील मसाल्याची कंपनी महाशियान दि हट्टी  अर्थात एमडीएचचे मालक आणि मसाला किंग महाशय धर्मपाल गुलाटी यांचं  आज निधन झालं. आज ३  डिसेंबर सकाळी ५ वाजून ३८ मिनिटांनी वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गुलाटी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून ते बरेही झाले होते. परंतु आज सकाळी दिल्लीच्या माता चंदन देवी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

त्याचप्रमाणे मागील वर्षी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी साठी भारत सरकारने त्यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन सन्मानित केले.

- Advertisment -

Most Popular