24 C
Mumbai
Thursday, November 21, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeSports Newsधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक

धोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक

कोरोनाच्या संकटामुळे यंदाची आयपीएल रद्द करण्यात आली असून सर्व खेळाडू आपापल्या घरी जाण्यास सुरुवात झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कूल कप्तान महेंद्र सिंह धोनी नेहमीच काही ना काही गोष्टीमुळे चर्चेत असतो. भारतातील कोरोनाचा वाढत संक्रमण आणि सध्या आयपीएलमधील काही खेळाडूंमध्ये कोरोनाचा झालेला शिरकाव, यामुळं यंदाची आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल जरी रद्द झाली असली तरी पण कर्णधार धोनी मात्र अजून स्वगृही परतला नाही आहे. कप्तान म्हणून आपली संघाप्रती असलेली तो जबाबदारीने पार पाडताना दिसत आहे. धोनीच्या या अनोख्या निर्णयामुळं चाहत्यांकडून जबाबदार कर्णधार म्हणून धोनीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मीडियाने दिलेल्या माहिती नुसार, धोनीने सांगितलं की, जोपर्यंत चेन्नईच्या संघातील सर्व खेळाडू आपापल्या घरी सुखरुपपणे पोहोचत नाहीत, तोपर्यंत तो तर हॉटेलमध्येच थांबणार आहे, तो स्वतः घरी जाणार नाही. सध्या दिल्लीतील एका हॉटेलमध्ये चेन्नईचे सर्व खेळाडू वास्तव्यास आहेत. धोनीनं घेतलेल्या या संघाच्या निर्णयामुळे जगभरातून वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, आयपीएल २०२१ खेळण्यासाठी भारतात आलेले अनेक परदेशी खेळाडू त्यांच्या मायदेशी घरी पोहोचले आहेत.

dhoni chennai super kings

कोरोनामुळे आयपीएलचा 14 वा मोसम रद्द करण्यात आला आहे. या सीझनमधील 29 सामने सुरळीतपणे कोणत्याही अडचणीशिवाय पार पडले, पण त्यानंतर मात्र कोरोनाची नजर आयपीएलकडे वळली आणि अनेक खेळाडू तसेच स्टाफना कोरोनाची बाधा झाली. यावर्षीच्या आयपीएल सीझनमध्ये धोनीच्या संघानं दमदार खेळी केल्याचं बघायला मिळालं. संघानं एकूण खेळलेल्या सात सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. यामुळे चेन्नईचा संघ आयपीएल पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर  होता.

चेन्नई संघाचे बॉलिंग कोच लक्ष्मीपति बालाजी, संघाचे सीईओ काशी विश्वनाथन आणि फलंदाजी कोच मायकल हसी यांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. गुरुवारी एयर अॅम्ब्युलन्सने  मायकल हसी आणि लक्ष्मीपति बालाजी यांना दिल्लीहून चेन्नईला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सध्या दोघेही कोरोनामुक्त झाले असून दोघांचीही प्रकृती स्थिर आणि उत्तम आहे. आयपीएल रद्द झाल्याची घोषणा झाल्यानंतर गुरुवारी अनेक परदेशी खेळाडू स्वगृही मायदेशी परतले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेशी खेळाडू स्वदेशी परतले आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाने १५ मे पर्यंत विमानसेवा बंद ठेवल्याने या संघाचे खेळाडू मालदीवला रवाना झाले असून तिथून परवानगी मिळाल्यानंतर सर्व खेळाडू मायदेशी ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहेत. याव्यतिरिक्त न्यूझिलंडचे अनेक खेळाडू शुक्रवारीच आपल्या मायदेशी परतले.

- Advertisment -

Most Popular