33 C
Mumbai
Sunday, February 16, 2025

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeNatureजगातील पहिला ट्रोपीझोडीअम विरिदुर्बिअम मेळघाटामध्ये

जगातील पहिला ट्रोपीझोडीअम विरिदुर्बिअम मेळघाटामध्ये

मेळघाट हा कीर्र घनदाट जंगले आणि त्यामध्ये सापडणाऱ्या दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या  वनस्पतींनी आच्छादलेला घाट म्हणजेच मेळघाट. जैवविविधतेने संपन्न असलेल्या मेळघाटात आता जगातील पहिला कोळी प्रजातीचा ट्रोपीझोडीअम विरिदुर्बिअम नर आढळून आला आहे. जीवशास्त्राचे अभ्यासक असलेले प्रा. अतुल बोडखे आणि त्यांच्या संशोधन करणाऱ्या टीमने घेतलेल्या संशोधनाच्या निष्कर्षाने यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. जगातील ट्रोपिझोडिअम विरिदुर्बिअम Tropizodium viridurbium या पहिल्या नर कोळ्याची नोंद दर्यापूरच्या स्तित स्पायडर संशोधन प्रयोग शाळेचे अतुल बोडखे आणि संशोधन टीम यांनी मेळघाटात केली आहे. २०१६ मध्ये या जातीच्या पहिल्या मादीची नोंद गुजरात मधील गांधीनगर येथील पालज जवळील अरण्य पार्क येथे करण्यात आलेली.

सध्या एकूण २०४ कोळ्यांच्या प्रजातींची मेळघाटात नोंद करण्यात आलेली आहे. या कोळीच्या प्रजातीतील नर हा लांबीने ३.६ मीमी असून मादीची लांबी ४.१ मीमी इतकी आहे. हा कोळी जंगलातील पाला पाचोळ्यामध्ये आढळतो. तसेच हा निशाचर असून आणि आकारानेही खूप छोटा असल्या कारणाने ओळखण्यास कठीण होतो. मेळघाटात या स्पायडरसारख्या विविध प्रजातींचा शोध लावण्याकरता पुन्हा शोध कार्य करण्याची आवश्यकता आहे.

जे. डी. पाटील सागऴुदकर महाविद्यालय दर्यापूर येथील कोळी संशोधन प्रयोगशाळा येथे या कोळी प्रजातीवर संपूर्ण अभ्यास  करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रयोग शाळेद्वारे १७ नवीन कोळी प्रजतींचा शोध लागलेला आहे. भारत सरकार आणि भारतीय वन्यजीव संस्था डेहराडूनकडून या सर्व प्रजतींचा अभ्यास सहयोगाने होत आहे. या संशोधनात भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून येथील डॉ. शाजिया कासिन, सुभाष कांबळे, डॉ. महेश चिखले, डॉक्टर व्ही.पी उनियाल, डॉ. गजानन संतापे व सावन देशमुख यांचा विशेष सहभाग होता.

जगामध्ये ट्रोपीझोडीअम या कोळ्याची पोटजातीच्या १२ प्रजाती दिसतात. त्यांपैकी भारतामध्ये ५ प्रकारच्या प्रजाती आढळतात. सध्या भारता व्यतिरिक्त जगामध्ये हवाई, फ्रेंच पोलिनेसिया, बाली, चीन, पाकिस्तान, थायलंड व उत्तर ऑस्ट्रेलिया येथे या प्रजाती आढळून येतात.

- Advertisment -

Most Popular