भारतासह जगभरातील किक्रेट प्रेमींच्या हृदयात गेली अनेक वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या मास्टर ब्लास्टरचा आज ४८ वा वाढदिवस. सचिन तेंदुलकर हे नाव सर्व जगात खूपच प्रसिद्ध आहे, अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे सचिन. आपल्या अफलातून फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांना वेड लावले आहे. वयाच्या १६ वर्षी क्रिकेट विश्वात पदापर्ण करणाऱ्या सचिनने क्रिकेटमध्ये आजपर्यंत अनेक इतिहास रचले. परंतु वयाच्या ४० व्या वर्षी त्यांने क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेतली. परंतु, त्याच्या याही निर्णयाला त्याच्या चाहत्यानी आनंदाने स्वीकारले. आज भारतीय क्रिकेट विश्वामध्ये सचिनला GOD OF CRICKET म्हणजेच क्रिकेटचा देव असे संबोधले जाते. सचिनच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जाणून घेऊया सचिनच्या आयुष्याबद्दल काही.
सचिनने जसे क्रिकेटविश्व गाजविले, जशी त्याच्या मैदानावरील विक्रमांची चर्चा असते, तशीच त्याच्या लव्हस्टोरी बाबतही बर्याच कथा ऐकायला मिळाल्या आहेत. सचिनची लव्ह स्टोरी चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. सचिन आणि त्यांची बायको अंजलीची पहिली भेट १९९० साली मुंबई विमानतळावर झालेली. सचिन तेंव्हा नेमका आपल्या क्रिकेट करियरमधील पहिल्या इंग्लंड क्रिकेट दौऱ्यावरून परत येत होता. दोघांनी तेंव्हा फक्त एकमेकांना पाहिलं होतं. तेंव्हा १७ वर्षीय असलेल्या सचिनने टेस्ट क्रिकेटमध्ये नाबाद ११९ रन्स असा विक्रम रचून भारतात येत होता. त्यावेळी पाकिस्तानी मुश्ताक मोहम्मद सामन्या नंतर अगदी कमी वयामध्ये टेस्ट मॅचमध्ये शतक ठोकण्याचा इतिहास आपल्या नावावर रचणार सचिन एकमेव होता. मुंबई एअरपोर्टवर अंजली आपल्या मैत्रीणीसह आईला घेण्यासाठी आली होती. यावेळी अंजलीची मैत्रिण डॉ. अपर्णा हीने सचिनला ओळखले आणि सचिनकडे बोट दाखवत अंजलीला सांगितले की, हा तोच आहे ज्याने इंग्लंडमध्ये सेंच्युरी पूर्ण केली होती. अंजलीने हे ऐकताच ऑटोग्राफ घेण्यासाठी सचिनच्या दिशेने धावली. यावेळी आपल्या मागे ऑटोग्राफसाठी धावत येणाऱ्या अंजलीला पाहून सचिन भांबावून गेला. पहिल्याच नजरेत अंजली सचिनवर भाळली होती. परंतु सचिन विमानतळावर नेण्यासाठी आलेल्या भाऊ अजित आणि नितीन सोबत गाडीमध्ये बसून निघून गेला. अंजलीने सचिनशी बोलण्यासाठी खूप प्रयत्न करून त्याचा फोन नंबर शोधून काढला. फोनवर बोलून त्यांच्यातली मैत्री अधिक घट्ट होऊन अखेर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण सचिनची क्रिकेट विश्वातील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालल्याने त्यांना प्रत्यक्ष भेटणे सुरक्षित वाटत नव्हते. त्यावेळी अंजली डॉक्टर पदवीचे शिक्षण घेत होती. त्यामुळे काही वेळेला अंजलीला भेटण्यासाठी सचिन ग्रांट मेडिकल कॉलेज जेजे हॉस्पीटलमध्ये जायचा. पाच वर्ष दोघं एकमेकांना डेट करत होते. सचिन थोडा लाजऱ्या बुजर्या स्वभावाचा असल्याने आपल्या घरातल्यांना अंजली सोबतच्या प्रेम संबंधांबद्दल त्याला सांगणे कठीण जात होते. परंतु इथेही अंजलीने पुढाकार घेऊन लग्नाची बोलणी केली. यावेळी सचिन अंजलीला म्हणाला होता, जगातील सर्वात फास्ट गोलंदाजाशी सामना करण्यापेक्षाही, अंजलीसह लग्नाची गोष्ट घरी सांगणे कठीण आहे. दरम्यान दोघांच्या घरचा होकार मिळाल्यानंतर २४ मे १९९५ मध्ये दोघ लग्न बंधनात अडकले.
सचिनने त्याच्या कारकीर्दीमध्ये विविध पुरस्कार जिंकले आहेत. त्यातील काहींबद्दल आपण माहिती पाहूया, १९९४ साली अर्जुन पुरस्काराने सचिनला सन्मानित केलेले, १९९७ साली राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार प्राप्त झाला. भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेला पद्मश्री पुरस्कार ९९९ साली तर २००० सालामध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले. भारताचा चौथा आणि दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न हा त्याला १६ नोहेंबर २०१३ रोजी झालेल्या अंतिम सामन्याच्या काही तासांनंतर पंतप्रधान कार्यालयाने पुरस्कार देण्याचा निर्णय जाहीर केला. आत्तापर्यंतचा सर्वात तरुण प्राप्तकर्ता आणि पुरस्कार मिळविणारा प्रथम खेळाडू सचिन ठरला आहे. तसेच त्याने आयसीसी पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूसाठी सर गारफिल्ड सोबर्स करंडकही जिंकले. तेंडुलकर यांना भारतीय संसदेच्या वरील सभागृहात राज्यसभेवर उमेदवारी २०१२ साली देण्यात आली. तसेच भारतीय वायुसेनेकडून ग्रुप कॅप्टनचा मानद रँक मिळवून देणारा हा पहिला खेळपटू आणि विमानचालन पार्श्वभूमी नसलेला पहिला व्यक्ती होता. असे एक ना अनेक विक्रम गाजवणाऱ्या सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…