निसर्गाचावरद हस्त लाभलेल्या कोकणच्या किनारपट्टीवर यंदा २०२५ च्या पर्यटन हंगामात पर्यटकांचा महापूर लोटल्याचे पाहायला मिळाले. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी गोव्याऐवजी रत्नागिरी जिल्ह्याला पसंती दिल्याने संपूर्ण जिल्हा हाउसफुल्ल झाला होता. या अभूतपूर्व गर्दीमुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळाली असून, यंदाच्या पर्यटन हंगामात सुमारे ६० कोटीच्यावर उलाढाल झाल्याचा अंदाज व्यावसायिकांनी वर्तवला. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आ है. रत्नागिरी, दापोली, गुहागर आणि गणपतीपुळेसारख्या प्रमुख पर्यटन केंद्रांवर पर्यटकांनी अक्षरशः गदींचे विक्रम मोडले, केवळ महाराष्ट्रच नव्हे तर शेबारील कर्नाटक आणि गुजरात राज्यांमधूनही मोठ्या संख्येने पर्यटक खासगी वाहने आणि बसने दाखल झाले होते. विशेष म्हणजे, यंदा मध्यमवर्गीय पर्यटकांनी महागड्या रिसॉर्ट्सपेक्षा स्थानिक ‘होम स्टे’ आणि ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ योजनांना अधिक पसंती दिली. यामुळे ग्रामीण भागातील घराघरात पर्यटनाचा पैसा पोहोचला आहे.
पर्यटनाच्या या लाटेचा सर्वाधिक फायदा स्थानिक बाजारपेठांना झाला. कोकणी मेवा आणि स्थानिक हस्तकला वस्तूंच्या विक्रीत यदा दुप्पट वाढ झाली आहे तसेच, हर्णे आणि मिरकरवाड़ा बंदरांसारख्या ठिकाणी मासळी खरेदीसाठी पर्यटकांची झुंबड उडाली होती. मासळी विक्रेत्यांच्या मते, केवळ मासळी बाजारात दररोज ३ ते ५ लाख रुपयांची उलाढाल झाली. याशिवाय, हॉटेल व्यावसायिक, रिक्षाचालक, गाईड्स आणि बोटसफारी चालवणाऱ्या स्थानिकांच्या उत्पत्रात मोठी भर पडली आहे.
पायाभूत सुविधा वाढवण्याची गरज – अडचणीही समोर आल्या आहेत. या प्रचंड गर्दीमुळे काही रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, अपुरी निवास व्यवस्था आणि काही ठिकाणी पार्किंगच्या समस्यांमुळे पर्यटकांना जर ही उलाढाल अशीच वाढवायची त्रास सहन करावा लागला. भविष्यात असेल तर पायाभूत सुविधांचा विकास करणे गरजेचे असल्याची भावना स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पर्यावरणपूरक पर्यटनालाही चालना – या वर्षी रत्नागिरीतील कांदळवन (मैग्रोव्हज) सफारी आणि कयाकिंग हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरले. नाचणे-नारायणमळी येथील खाडीसफारीला पर्यटकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पर्यावरणपूरक पर्यटनालाही चालना मिळाली आहे. जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा आता शेती आणि मासेमारीच्या बरोबरीने महत्त्वाचा ठरू लागला आहे.
