अमेरिकेत नुकत्याच अध्यक्षीय निवडणुका पार पडल्या. अमेरिकेची प्रथम महिला होणाऱ्या जिल बायडन यांनी प्रामुख्याने शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आहे. म्हणूनच, शिक्षणाशी संबंधित धोरणाच्या संदर्भात, अनुभवी माला अडीगा यांची या पदासाठी निवड केली गेली आहे. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेच्या राजकारणात भारतीयांचे वर्चस्व सतत वाढत आहे. अडीगा बायडेन यांच्या २०२० च्या प्रचार मोहिमेची वरिष्ठ धोरण सल्लागार तर जिल बायडन यांची वरिष्ठ सल्लागार होती. माला अडीगाने यापूर्वीही बायडेन फाऊंडेशनमध्ये उच्च शिक्षण व लष्करी कुटुंबांचे संचालक म्हणून काम पाहिले आहे. म्हणून अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी भारतीय-अमेरिकन माला अडीगा यांना पत्नी जिल बायडेन यांच्या धोरण संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे मला अडीगा यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकीर्दीमध्ये शैक्षणिक आणि सांस्कृतिक ब्यूरो मध्ये शैक्षणिक कार्यक्रमांसाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहाय्यक सचिव होत्या. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वरिष्ठ महिला सल्लागार आणि जागतिक महिला विषयांच्या कार्यालयात विशेष दूत म्हणून काम पाहिले आहे. तसेच अमेरिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचेही वर्चस्व दिसून आले आहे. कमला हॅरिस यांनी नुकतीच अमेरिकेच्या झालेल्या निवडणुकीत उपराष्ट्रपती पदावर विजय मिळविला आहे.
Congratulations to newly appointed policy director for @DrBiden, Mala Adiga ’93! As a Grinnellian, Mala will be a leader and innovator in the White House. https://t.co/o2n2Vb9GEz
— Anne F. Harris (@grinnellprez) November 20, 2020
६९ वर्षांच्या प्रथम महिला जिल बायडन यांनी अनेक दशके शिक्षिका म्हणून काम केलं आहे. पदवीधर असलेल्या जिल यांच्याकडे दोन मास्टर्स डिग्रीही आहेत. २००७ साली डेलवेअर विद्यापीठातून त्यांनी शिक्षण या विषयात डॉक्टरेटही मिळवली. त्याचप्रमाणे वॉशिंग्टनला स्थायिक होण्याआधी त्यांनी कम्युनिटी कॉलेज, पब्लिक हायस्कूल आणि सायकॅट्रीक हॉस्पिटलमध्ये किशोरवयीन मुलांना शिकवले आहे. जो बायडन हे बराक ओबामा यांच्या सरकारमध्ये उपराष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळी जिल बायडन नॉर्दन वर्जिनिया कम्युनिटी कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका होत्या. २००९ ते २०१७ या कालावधीत जो बायडन अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळी जिल बायडन अमेरिकेच्या सेकंड लेडी होत्या. सेकंड लेडी म्हणून त्यांनी कम्युनिटी कॉलेजचा प्रचार केला, ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागरुकता निर्माण करण्याचं काम केलं. तसंच सैन्य जवानांच्या कुटुंबीयांसाठीही त्यांनी काम केलं.फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्यासोबत मिळून जिल यांनी जॉईनिंग फोर्सेस उपक्रमाचीही सुरुवात केली होती. निवृत्त सैन्य अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिक्षण आणि रोजगाराच्या उत्तम संधी मिळण्यासाठी मदत करण्याचं काम या उपक्रमांतर्गत करण्यात येते.